जगातील सर्वात मोठे इनडोअर थीमपार्क सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 20:41 IST
आपल्या भव्यदिव्य वास्तूंसाठीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबई शहरात जगातील सर्वात मोठे इनडोअर थीम पार्क सुरू झाले आहे.
जगातील सर्वात मोठे इनडोअर थीमपार्क सुरू
आपल्या भव्यदिव्य वास्तूंसाठीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबई शहरात जगातील सर्वात मोठे इनडोअर थीम पार्क सुरू झाले आहे. या फन पार्कमध्ये प्रसिद्ध मार्व्हल कॉमिक्स कॅरेक्टर्स (स्पायडरमॅन, कॅप्टन अमेरिका) व कॉर्टून नेटवर्कच्या राईडस्चा सामावेश असणार आहे.१५ लाख चौ. फूट जागेवर पसरलेल्या या आनंदनगरीची बुधवारी सर्वसामान्यांसाठी दारं खुली झाली आहेत. आता दुबई जरी वाळवंटामध्ये वसलेले शहर असले तरी हे पार्क संपूर्णत: वातानुकूलित आहे. ‘आयएमजी वर्ल्ड आॅफ अॅडव्हेंचर पार्क’मध्ये दररोज तीस हजार लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे.पार्कमध्ये मार्व्हल आणि कार्टून नेटवर्क झोन्स, लॉस्ट व्हॅली डायनॉसोर झोन आणि हाँटेड हॉटेल हे प्रमुख आकर्षण ठरणार. राईडमध्ये स्पिनिंग स्पायडरमॅन रोलर कोस्टर आणि पाऊरफुल गर्ल्स राईडचा सामावेश आहे. यावर्षी दुबईमध्ये दोन अॅडव्हेंचर पार्कस् सुरू होणार आहे. त्यांपैकी हा एक आहे. २०२० पर्यंत दरवर्षी दोन कोटी पर्यटकांना दुबईकडे आकर्षित करण्याच्या हेतूने या पार्कस्ची निर्मिती केली जात आहे.