जगातील सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:49 IST
जगभरात मात्र अशा बुलेट ट्रेन्स चक्क वाºयाशी स्पर्धा करीत आहेत
जगातील सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन्स
बुलेट ट्रेनचे औत्सुक्य भारतीयांना खूपच आहे. त्याच त्या रखडत जाणाºया ट्रेन पाहून भारतीय कंटाळले आहेत. त्यांना भारतामध्ये बुलेट ट्रेन केव्हा येतेय असं झालंय. भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे, पण कधी ते सांगता येणार नाही. जगभरात मात्र अशा बुलेट ट्रेन्स चक्क वाºयाशी स्पर्धा करीत आहेत. अशाच काही वेगवान बुलेट ट्रेन्सची ही माहिती...शांघाय माग्लेव जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनमध्ये धावत आहे. खºया अर्थाने बुलेटचा अर्थ या ठिकाणी समजतो. या ट्रेनचा सर्वाधिक वेग ४३० किमी प्रतितास इतका आहे. साधारण वेग २५० कि. मी. प्रतितास इतका आहे. २००४ साली ही ट्रेन लोकांसाठी खुली करण्यात आली. शांघाय माग्लेव डेव्हलपमेंट कोआॅपरेशनच्या सहकार्याने ही ट्रेन चालविली जाते. टैसेन आणि सिमेन्स कंपनीने ती तयार केली आहे. एकावेळी ५७४ प्रवासी यात प्रवास करू शकतात. भारतीय रुपयानुसार तिचे तिकीट ५५० रुपयांपासून ते ११०० रुपयांपर्यंत आहे.हार्मनी ३८० ए जगातील ही दुसºया क्रमांकाची वेगवान ट्रेन असून, ती चीनमध्ये धावते. याच्या चाचणीदरम्यान एक विक्रम झाला. ४१६.६ कि. मी. प्रतितास इतक्या वेगाने ही ट्रेन धावली. २०१० साली ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. शांघाय आणि बिजिंग दरम्यान ती धावते. सीएसआर लोकोमोटिव्ह आणि रोलिंग स्टॉक कंपनीजने या ट्रेनची निर्मिती करण्यात आली. ४९४ प्रवासी यात बसू शकतात. यामध्ये बºयाच सोयीसुविधा आहेत.एजीव्ही इटालो २००७ साली घेतलेल्या चाचणीत या ट्रेनने सर्व विक्रम मोडले. ५७४ कि. मी. प्रतितास इतक्या वेगाने ती धावली. सध्या ३६० कि. मी. प्रतितास असा तिचा वेग आहे. फ्रेंच कंपनी अल्स्टॉमने या ट्रेनची निर्मिती केली आहे. नापोली-रोमा-फ्रिएेंज-बोलोग्रा-मिलानो दरम्यान धावते. नापोली ते रोम हे अंतर १८९.७ कि. मी. इतके असून एका तासापेक्षा कमी वेळेत ती तेथे पोहोचते. या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९८ टक्के टाकाऊ वस्तूपासून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे.