शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गेलच्या विरोधात उभी राहिली महिलाशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:11 IST

क्रिकेटच्या मैदानावर ख्रिस गेल हे नाव ऐकताच भल्याभल्या गोलंदाजांना घाम सुटतो. केवळ बॉऊंड्री लाईनच न...

क्रिकेटच्या मैदानावर ख्रिस गेल हे नाव ऐकताच भल्याभल्या गोलंदाजांना घाम सुटतो. केवळ बॉऊंड्री लाईनच नाही तर स्टेडियमच्या बाहेर बॉल टोलवण्याची त्याची क्षमता तर लाजवाबच. त्याचे मैदानावरचे कॅरिबियन नृत्य सगळ्यांनाच आवडते. मात्र नव्या वर्षाची सुरुवात गेलसाठी फार वाईट झाली. लाईव्ह टीव्हीवर महिला पत्रकाराशी सलगी केल्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका होत आहे. आता तर गेलच्या विरोधात महिलाशक्ती उभी ठाकली आहे.ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या बिग बॅश लिग सामन्याच्या दरम्यान महिला पत्रकाराला त्याने डेटवर येण्याची मागणी केली. यावरून उठलेल्या वादळामुळे त्याला स्पर्धेत खेळण्यास बंदी आणि ७२00 डॉलर्सचा दंड ठोठावला गेला. त्याला माफीसुद्धा मागावी लागली. पण हे वादळ शमण्याचे काही चिन्हे दिसत नाही. ख्रिस गेलने यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा खुलासा जगभरातील अनेक महिलांनी केला आहे.नाव न सांगण्यच्या अटीवर एका महिला पत्रकाराने सांगितले की, ऑस्ट्रेलियात झालेल्या २0१५ वर्ल्ड कपच्या वेळी गेलने तिला उद्देशून लॉकर रूममध्ये जाणूनबुजून टॉवेल खाली पाडला. योवने सॅम्पसन यांनी सांगितले की, गेल हा पहिल्या क्रमांकाचा स्त्रीलंपट आहे. आतापर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई कशी झाली नाही याचे मला आश्‍चर्य वाटते. तो जसा होता, आताही तसाच आहे आणि तसाच राहणार यात काही शंका नाही.