तिशीच्या आतच पिता बनण्याचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:32 IST
पॉप स्टार जस्टिन बीबरचे म्हणणे आहे की, तिशीच्या आतच त्याला संसार थाटायचा आहे. २२ वर्षीय बीबरने स्पष्ट केले की, पुढील आठ वर्षात त्याला त्याचा जीवनसाथी शोधायचा आहे.
तिशीच्या आतच पिता बनण्याचे स्वप्न
पॉप स्टार जस्टिन बीबरचे म्हणणे आहे की, तिशीच्या आतच त्याला संसार थाटायचा आहे. २२ वर्षीय बीबरने स्पष्ट केले की, पुढील आठ वर्षात त्याला त्याचा जीवनसाथी शोधायचा आहे. तसेच त्याला याच काळात पिताही बनायचे आहे. जेव्हा बीबरला ‘तुझे स्वप्न काय आहे’ असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने अशाप्रकारचे उत्तर दिले. तसेच मी ज्या मुलीला पसंत करेल तिच्यावर जीवापाड प्रेम करणार आहे. केवळ तिच्याकडे सेंस आॅफ ह्यूमर असायला हवा, असेही त्याने सांगितले.