विक्टोरिया- डेव्हिड बॅकहम विभक्त होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:54 IST
विक्टोरिया- डेव्हिड बॅकहम विभक्त होणार?फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅम व फॅशन आयकॉन व्हिक्टोरिया बॅकहॅम विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे
विक्टोरिया- डेव्हिड बॅकहम विभक्त होणार?
फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅम व फॅशन आयकॉन व्हिक्टोरिया बॅकहॅम विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. 2016 हे वर्ष दोघांसाठी चांगले नाही काय अशी चर्चा सुरू झाली आहे. डेव्हिड व व्हिक्टोरिया आपल्या कामात अतिव्यस्त असल्यामुळे दोघांनीही एकमेकांना घडस्फोट देण्याचा निर्णय घेतला असल्याची हॉलिवूडलाईफ. कॉमने सांगितले आहे. 2004 मध्ये दोघेही विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होत आहे का? असा सवालही केला जात आहे. या आधी व्हिक्टोरियाने डेव्हिडवर प्रेमात दगा दिल्याचे आरोप लावले आहेत. मात्र त्यावेळी डेव्हिड घटस्फोटापासून बचावला होता. मात्र यावेळी असे होणार नाही अशीही चर्चा आहे. हॉलिवूडलाईफ. कॉम या संकेतस्थळावर झळकलेली ही बातमी अनेकांचे हृदय तोडणारी ठरली आहे एवढे निश्चित!...