आशीष नेहराकडून पुरस्कार घेणारा हा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 22:08 IST
टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया वि. इंडिया सामन्यात विराट कोहलीच्या तडाखेबंद बॅटींगने सगळ्यांना खिळवून ठेवले असतानाच तिकडे सोशल मीडियावर विराटचा बालपणीचा फोटो फिरत होता
आशीष नेहराकडून पुरस्कार घेणारा हा कोण?
टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया वि. इंडिया सामन्यात विराट कोहलीच्या तडाखेबंद बॅटींगने सगळ्यांना खिळवून ठेवले असतानाच तिकडे सोशल मीडियावर विराटचा बालपणीचा फोटो फिरत होता. आशिष नेहरा एका लहान मुलाला पुरस्कार देऊन गौरवित असल्याचा हा फोटो होता. हा लहान मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून विराट कोहली होता. यानंतर काही वर्षांनी आशिष नेहरा व विराट कोहली एकत्र खेळताना दिसले. २०११ मध्ये विश्वचषक जिंकून आणणाºया भारतीय टीममध्ये आशिष व विराट या दोघांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे काल रविवारी आॅस्ट्रेलियास धूळ चारणाºया टीममध्येही आशीष व विराट होते. या सामन्यात विराटच्या खेळीनंतर संपूर्ण देश विराटमय झाला असताना त्याचा हा जुना फोटो चांगलाच लाईक केल्या गेला.