शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

‘फ्रेण्डशिप डे’ ला स्पेशल दिसायचयं.. मग या स्टाइल टिप्स वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:25 IST

एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण ‘फ्रेण्डशिप डे’लात्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स आणि टिप्स

ठळक मुद्दे* नेल आर्टपेक्षाही मिरर नेलपॉलिश ट्राय करून बघा.* पावसाळ्यात वापरले जाणारे फ्लोरल प्रिण्टचे स्कर्ट्स किंवा रॅप अ राऊण्ड, गिंगहॅम स्कर्ट वगैरे घालूनही तुम्हाला फ्रेण्डशिप्स डे ला मिरवता येईल.* मुलांनाही त्यांच्या ग्रूपकरिता सारख्या रंगाचे टीशर्ट वगैरे घालता येतील. किंवा सारख्या रंगाचे टीशर्ट आणायचे आणि त्यावर मैत्रीचे संदेश रंगांनी लिहायचे. अशीही आयडीया लढवता येईल.

 मोहिनी घारपुरे-देशमुख 

फ्रेण्डशिप्स डे ची वाट तरूण मुलं मुली दरवर्षीच पहात असतात. बाजारात राख्यांबरोबरच फ्रेण्डशिप बॅण्डही दिसायला लागले की तरूणांमध्येही उत्साह संचारतो. मला आठवतं एका वर्षी तर फ्रेण्डशिप डे आणि राखीपौर्णिमा दोन्हीही एकाच दिवशी आल्यानं कॉलेजमध्ये खूप धम्माल होती. ज्याला भाऊ मानायचं तो फ्रेण्डशिप बॅण्ड घेऊन समोर यायचा. मग त्याच्याकडून बॅण्ड बांधून घ्यायचा अन त्यालाच राखी बांधायची. सगळ्या कॉलेजभर नुसती मजा सुरू होती..एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण असा काही विशेष दिवस असला की त्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. फ्रेण्डशिप डेला तर अनेक ग्रूप्स काहीतरी ठरवून सारखं करतात, जसं, सारख्या रंगाचे कपडे घालतील. एकाच ग्रूपचे मुलंमुली एखादी सेम अ‍ॅक्सेसरी कॅरी करतील असं काहीतरी करून दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवतात.तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स तुमच्यासाठी .. मग तुम्ही त्या एकट्यानं करू शकता किंवा ग्रूपनंही करू शकता.

'फ्रेण्डशिप डे' चे स्टाइल फंडे 

क्रेझी  नेलपॉलिश 

लांब लांब नखं असलेल्या मुलींनी फ्रेण्डशिप्स डेला हाताच्या सौंदर्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. हल्ली मिरर नेलपॉलिश आणि न्यूड कलर्स एकदम इन आहेत. त्यामुळे तुम्ही नेल आर्टपेक्षाही असे नेलपॉलिश ट्राय करून पाहा.

 

DIY फ्रेण्डशिप्स बॅण्ड

बाजारात कितीही आकर्षक फ्रेण्डशिप्स बॅण्ड असतील तरीही तुमच्या मित्रमैत्रिणींना जर तुम्ही स्वत: तयार केलेले बॅण्ड बांधलेत तर त्याची त्यांच्या लेखी नक्कीच जास्त किंमत असेल. किंबहुना असा बॅण्ड ते त्यांची आठवण म्हणून कायम स्वरूपी सांभाळून ठेवतील. त्यामुळे इंटरनेटवर बरेच DIY आहेत ते पाहून किंवा स्वत:ची आयडिया लढवून तुम्ही एखादा हटके बॅण्ड बनवा आणि तो तुमच्या मित्रमैत्रीणींच्या हातावर ऐटीत बांधा.जीन्स

सध्या जीन्समध्येही बाजारात अनेक नवीन स्टाइल्स आल्या आहेत. त्याचबरोबर केप्रिज, क्यूलोट्स, थ्री फोर्थ, ट्राऊझर्स यांमध्येही अनेक व्हरायटी तुम्ही यंदाच्या फ्रेण्डशिप डेला ट्राय करू शकता.

मिक्स अ‍ॅण्ड मॅच

खरंतर हा प्रकार तुमच्या अ‍ॅस्थेटीक सेन्सवरच अवलंबून आहे. तुमच्या वॉर्डरोबमधल्या पंजाबी ड्रेसेस, कुर्तीज आणि ओढण्या यांच्यात रंगसंगती साधर्म्य लक्षात घेऊन कॉम्बिनेशन करा आणि नवा ड्रेस घातल्याप्रमाणे मिरवा. कोणाच्या लक्षातही येणार नाही. फक्त थोडासा अ‍ॅस्थेटीक सेन्स मात्र वापरावा लागतो.स्कर्टस

स्कर्टस हे तर आॅल सिझन छानच दिसतात. पण विशेषत: पावसाळ्यात फ्लोरल प्रिण्टचे स्कर्ट्स किंवा रॅप अ राऊंड, गिंगहॅम स्कर्ट वगैरे घालूनही तुम्हाला फ्रेण्डशिप्स डे ला मिरवता येईल. विशेष म्हणजे एकाच ग्रू्रुपमधल्या सगळ्या मुलींनी ठरवून स्कर्ट घालायलाही हरकत नाही .. त्यामुळे तुमचा ग्रूप उठून दिसेल.

DIY टीशर्ट्स

मुलांनाही त्यांच्या ग्रूपकरिता सारख्या रंगाचे टीशर्ट वगैरे घालता येतील. किंवा सारख्या रंगाचे टीशर्ट आणायचे आणि त्यावर मैत्रीचे संदेश रंगांनी लिहायचे. अशीही आयडीया लढवता येईल. फ्रेण्डशिप्स डेला तुम्ही हटके दिसाल हे नक्की.

कॉमन अ‍ॅक्सेसरी

ब्रेसलेट किंवा अँक्लेटसारख्या कॉमन अ‍ॅक्सेसरीज हमखास वापरा. तसच गॉगल, बेल्ट्स, ज्वेलरी यांपैकीही ग्रू्रुपमध्ये ठरवून एक सर्वांना सारखी अ‍ॅक्सेसरी निवडा आणि ती या दिवशी घाला.याशिवाय आणखीही अनेक आयडिया लढवता येतील आणि या दिवशी स्टायलिश, हटके दिसता येईल.. बघा, तुम्हाला या स्टाइलमध्ये अ‍ॅड करायला आणखी काही सूचतय का ते...?