शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रगत जनुकीयविज्ञान युगात विवाहसंस्थेचे भविष्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:58 IST

जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर कसा परिणाम होईल?

भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते. या चर्चेला आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होताना दिसत आहे. पुलित्झर विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी लिखित दुसरे पुस्तक ‘द जीन : अ‍ॅन इंटिमेट हिस्ट्री’ नुकतेच मुंबईत लाँच झाले. या प्रसंगी मुर्ती 'क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया'चे संस्थापक रोहन मुर्ती यांनी मुखर्जींसोबत चर्चा केली. अनुवंशिकशास्त्र किंवा जननशास्त्राच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवाला होणाऱ्या लाभांसोबतच काही गंभीर प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत. मुखर्जी म्हणाले, कल्पनना करा की आजपासून दहा वर्षांनी तुम्ही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तुम्ही डॉक्टरकडे गेला असता, बाळाच्या पेशींची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, बाळाला न्युरोडिजनेरेटिव्ह डिसिज् (मेंदूतील चेतापेशींचा आजार) होण्याची ४० टक्के शक्यता आहे. अशावेळी तुमच्या लग्नावर, नातेसंबंधावर कसा परिणाम होईल? तुम्ही कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट होणार?जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर कसा परिणाम होईल याविषयी चिंता व्यक्त करताना मुर्ती म्हणाले की, खरंच किती अवघड होऊन बसेल जर एखाद्या व्यक्तीला कळाले की, त्याच्या जनुकांमुळे त्याला होणारे मुलं आजारांनी ग्रस्त असेल. कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळायची?पुस्तकात मुखर्जींनी लिहिले आहे की, माझ्या पत्नीला जेव्हा मी कुटुंबातील अनुवंशिक आजराबद्दल सांगितले तो क्षण खरंच खूप अवघड आणि निर्णायक होता. अशा कबुलीमुळे माझ्या नात्यावर काय परिणाम होणार याचे निश्चित असे उत्तर माझ्याकडे नव्हते.जर समजा एखाद्या अनाथ मुलाची जनुकीय मॅपिंग केली असता कळाले की, त्याला एखादा आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याला कोणी दत्तक घेईल का? असे असंख्य प्रश्न आणि जर-तरच्या गोष्टी भविष्यात आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. यावर मुखर्जी म्हणतात की, सर्व पूर्वज्ञान झिडकारून आपण दुर्लक्ष क रण्याचा पर्याय स्वीकारू शकतो. पण आता मात्र तसे करणे शक्य नाही.सिद्धार्थ मुखर्जी