मुलांसाठी लग्नाचा खास मेकअप ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 04:49 IST
.लग्न आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा सोहळा असतो. सर्वजण तो क्षण कायमचा फोटोमध्ये कैद करता यावा, यासाठी धडपडत असतात
मुलांसाठी लग्नाचा खास मेकअप ट्रेंड
. अशा या मंगलप्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात आपण सुंदर दिसावे अशी नवरीची इच्छा असते. परंतु आता केवळ नवरीच नाही तर नवरदेवसुद्धा लग्नामध्ये सर्वाेत्तम दिसण्याचा आग्रह धरतात. म्हणून तर आता मुलांसाठी लग्नाचा खास मेकअप ट्रेंड आलेला आहे. मॅक कॉस्मेटिक्स येथील ग्लोबल सिनियर आर्टिस्ट सोनिक सरवटे म्हणतो, लग्नसोहळ्यात फोटोग्राफी करतेवेळी वापरण्यात येणार्या तेजस्वी लाईट्समुळे चेहर्याचा रंग फिका पडतो. चेहर्याचा रेखीवपणा खराब होतो. पुरुषांचा चेहरा आणि महिलांचा चेहर्यांमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे त्यांचे मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नवरदेवाचा मेकअप मॅट किंवा सॅटिन टेक्सचर असावा. चेहर्यावर तेज किंवा उजळ करण्यासाठी कृत्रिम प्रोडक्ट वापरू नयेत.मुंबईची मेकअप आर्टिस्ट प्रिया कपूर या बदलत्या ट्रेंड समजावून सांगताना म्हणते की, चेहर्याच रेखीवपणा उठून दिसण्याकडे माझा कल असतो. आपल्या चेहर्याच्या टोनपेक्षा डार्क असे दोन शेड्स चेहर्यांच्या एका विशिष्ट ठिकाणी लावले तर चेहर्याचा आकार आकर्षक दिसतो.अनेक सेलिब्रेटींचे मेकअप करणारा ओजस राजनी सांगतो की, 'आधी पुरुष केवळ डोळ्या खालील ब्लॅक सर्कल लपविण्यासाठी मेकअप करायच; परंतु आता चेहर्याच्या ठेवणीकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. फोटोग्राफमध्ये सुंदर दिसावे, तो क्षण स्पेशल कराण्यासाठी पुरुषही आता इंटरेस्ट घेऊ लागले आहेत.