विराटने काढली अनुष्काची खिल्ली उडवणाºयांची लाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 19:19 IST
अनुष्का शर्मा हिची खिल्ली उडवणाºयांना विराटने चांगलीच चपराक हाणली.
विराटने काढली अनुष्काची खिल्ली उडवणाºयांची लाज
भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यानंतर संपूर्ण देश ‘विराटमय’ झाले असतानाच, आज सोमवारी विराट काहीसा आक्रमक झालेला दिसला. अनुष्का शर्मा हिची खिल्ली उडवणाºयांना त्याने चांगलीच चपराक हाणली. अनुष्का व विराटच्या प्रेमसंबंधाच्या बातम्यानंतर त्यांच्यातील कथित ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. याबाबत दोघांनीही अधिकृतरित्या कुठलाही वक्तव्य केले नसताना सोशल मीडियावर अनुष्का व विराटसंदर्भातील मॅसेज व जोक्सचा पूर आला. अनेका कोहलीच्या नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडून त्यावर विनोद केले गेले. विराटला हे सगळे असह्य झाले आणि त्याने आज तोंड उघडलेच. माझ्यासंदर्भातील नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडणाºयांना लाज वाटायला हवी. क्रिकेटमधील माझ्या कामगिरीवर अनुष्काचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यानंतरही तिच्यावर अकारण टीका करणाºयांना, तिची खिल्ली उडवणाºयांना लाज वाटायला हवी, असे विराटने म्हटले. शिवाय तुमची स्व:ताची प्रेयसी, बहीण वा पत्नीची कुणी अशीच खिल्ली उडवली तर तुम्हाला कसे वाटेल, असा बोचरा सवालही केला. अनुष्काने मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तिने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असेही विराटने म्हटले आहे. अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर विराटची कामगिरी सुधारली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून विराट व अनुष्का यांचे नाते थट्टेचा विषय बनले होते.