शारीरिक शोषणाची बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 02:41 IST
अभिनेत्री जॅमी किंगने खळबळजनक खुलासा केला की, तारुण्यअवस्थेत ती शारीरिक शोषणाला बळी पडली आहे. किंगने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
शारीरिक शोषणाची बळी
अभिनेत्री जॅमी किंगने खळबळजनक खुलासा केला की, तारुण्यअवस्थेत ती शारीरिक शोषणाला बळी पडली आहे. किंगने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. वयाच्या १२ व्या वर्षीच तिला यासर्व प्रकाराला बळी पडावे लागले. या घटनेचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. यातुन ती सावरण्याचा प्रयत्न करीत होती. अशातच गायिका लेडी गागा हिने तिला याबाबतचा जाहिरपणे खुलासा करण्याचा सल्ला दिला. ही घटना जगासमोर माांडण्याची हिंमत दिल्याबद्दल जॅमीने लेडी गागाचे आभार मानले.