VALENTINE'S DAY IDEAS: ‘रोझ डे’ साजरा करण्याच्या चार रोमॅण्टिक आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 18:01 IST
आपल्या आवडत्या व्यक्तीला खऱ्या प्रेमाची क बुली देण्याचा हा आठवडा. तर मग आज ‘रोझ डे’ साजरा करण्याचा तुमचा काय स्पेशल प्लॅन आहे? आम्ही सांगतो तुम्हाला कसा करायचा ‘रोझ डे’ साजरा.
VALENTINE'S DAY IDEAS: ‘रोझ डे’ साजरा करण्याच्या चार रोमॅण्टिक आयडिया
७ फेब्रुवारी म्हणजे ‘रोझ डे’. म्हणजे ‘व्हॅलेंटाईन वीक’चा पहिला दिवस. तमाम प्रेमवीरांचा सर्वात आवडीचा काळा आता अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला खऱ्या प्रेमाची क बुली देण्याचा हा आठवडा.तर मग ‘रोझ डे’ साजरा करण्याचा तुमचा काय स्पेशल प्लॅन आहे?काय सांगता? अद्याप काही प्लॅन नाही? काही सुचतच नाही कसा सेलिब्रेट करायचा हा दिवस?अहो चिंता कशाला करता. आम्ही सांगतो तुम्हाला कसा करायचा ‘रोझ डे’ साजरा. तोदेखील एकदम स्पेशल प्रकारे. तर मग तुम्ही असं करा की,१. योग्य तो गुलाब निवडारंगानुसार गुलाबाच्या फुलांचा अर्थ वेगवेगळा असतो. म्हणजे प्रेमासाठी लाल गुलाब देतात, मैत्रीसाठी पिवळा गुलाब तर आभार व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब, माफी मागण्यासाठी पांढऱ्या रंगााचे गुलाब दिले जाते. व्यक्तीनुसार व तुमच्या खऱ्या भावनांनुसार योग्य त्या गुलाबाची निवड करा.२. पुष्पगुच्छ घरी पाठवून सरप्राईज द्यातुमच्या प्रिय व्यक्तीच्या घरी सकाळी सकाळी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ पाठवून त्यांना सरप्राईज द्या. परंतु तो बुके अशा पद्धतीने सजवा की, तुमच्या भावना त्यामधून व्यक्त झाल्या पाहिजे. वाटल्यास एखादा छान संदेशसुद्धा लिहा. विशेष म्हणजे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वया एवढे किंवा तुमच्या नात्याला जेवढे दिवस झाले तेवढ्या गुलाबांचा बुके देऊ शकता.३. रोमॅण्टिक जागी स्वत: गुलाब द्या‘रोझ डे’ला एक यादगार दिवस बनवण्यासाठी आजच्या दिवशी तुमच्या प्रियकर/प्रेयसीला एखाद्या स्पेशल रोमॅण्टिक ठिकाणी घेऊन जा. म्हणजे एखादे हिलस्टेशन, नदीकिनारी किंवा समुद्रकिनारी तुम्ही जाऊ शकता. तेथे प्रोपोज केल्याप्रमाणे एका गुडघ्यावर बसून तुम्ही गुलाब देऊन पार्टनरला खुश करू शकता. ४. जोडीदाराच्या आवडीनुसार गिफ्ट द्याआज जरी ‘रोझ डे’ असला तरी तुम्ही गुलाबांबरोबरच काही गिफ्टदेखील देऊ शकता. प्रेयसीच्या आवडीनुसार एखादे चांगले गिफ्टसोबत गुलाब देण्याची कल्पनासुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळे एक तर प्रेयसी खुश होईल आणि तुमच्या नात्याला उभारी मिळेल.► ALSO READ: व्हॅलेंटाईन्स डे’पर्यंतच्या संपूर्ण दिवसांची यादी►ALSO READ: होम मेड गिफ्ट आयडियाज्