शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

​रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी वापरा ‘टाय’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 15:51 IST

आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा चांगले दिसण्यासाठी महिला वर्गाला मेकअप, दागिने, फॅशनेबल कपडे आदी पर्याय असतात.

आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा चांगले दिसण्यासाठी महिला वर्गाला मेकअप, दागिने, फॅशनेबल कपडे आदी पर्याय असतात. पुरुषांकडे त्या तुलनेने फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. मात्र, पुरूष रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ‘टाय’चा वापर करु शकतात. आजच्या सदरात आपण टायचे प्रकार किती व नेमके कोणत्याप्रकारच्या टायमुळे आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसेल याविषयी जाणून घेऊयात...लग्न, संमेलने, सोहळा, सभा आदी कार्यक्रमात महिला वर्ग पुरुषांना मागे टाकत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतात. पुरुषवर्गाने आता पुढाकार घेत आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी टाय वापरायला काहीही हरकत नाही. काही शाळांमध्ये तर गणवेशात टाय हा अनिवार्य आहे. त्यानंतर मात्र आपण रोजच्या जगण्यात टाय वापरतच नाही. बहुतेकदा फक्त एकतर लग्न सोहळ्याप्रसंगी नाहीतर नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी क्वचितच टाय बांधून जातो. तसे मार्केटिंग अथवा विक्री क्षेत्रात काम करणाऱ्याना तर ड्रेस कोड म्हणून रोज टाय बांधावाच लागतो. टाय बांधल्याने आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार तर दिसतेच शिवाय टाय सभ्यतेचा संकेतदेखील मानला जातो. आपण काय काम करतो, किती पैसे कमवितो याला महत्त्व नाही, पण आपण चारचौघात कसे दिसता याला महत्त्व आहे. त्यामुळे विशेष प्रसंगी, नाईट आऊट किंवा पार्टीमध्ये एकदम रुबाबदार, क्लासी किंवा फंकी दिसण्यासाठी तुमच्या कपाटात काही चांगल्या टाय नक्कीच असायला पाहिजेत. शर्टवर कोणत्या प्रकारची टाय चांगली दिसेल हे आपण आपल्या शरीरयष्टीवरून ठरवू शकतो. जसे स्थूल शरीरयष्टी आणि जास्त वजन असणाऱ्या माणसांना ब्रॉड टाय आणि वजनाने कमी असलेल्या व्यक्तींना थीन टाय शोभून दिसते. प्रसंगानुरूप टायची लांबी बदलत राहते. कार्यालयात परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेल्टपर्यंत लांब असतात, तर पार्टीमध्ये परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेली बटन लांबीच्या असतात.  स्किनीकॉटन, चामडे किंवा लोकरापासून बनविल्या जाणारा हा स्किनी टाय विदेशात आताही तेवढाच प्रसिद्ध आहे. फोर इन हॅन्ड नेक टायमध्ये काही बदल करुन तयार करण्यात आलेला हा टाय १९५० च्या दशकापासून बेटलिससारख्या पॉप आयकॉन्समुळे लोकप्रिय आहे. चेक्स, स्ट्रिप्स, प्लेन, लाइन्स अशा अनेक डिझाइन्समध्येही टाय उपलब्ध असते. फॉर्मल पँट्सपेक्षा जिन्सवर स्किनी टाय फार उठून दिसतात.  फोर इन हॅन्ड नेकतरुणाई व नोकरदारांमध्ये सर्वात लोकप्रिय असणारा टाय म्हणजे फोर इन हॅन्ड नेक होय. हा टाय विविध रंग, डिझाईन्स, रुंदी आणि कापडाच्या विविध प्रकारात उपलब्ध आहे. कार्यालयात वावरताना आणि पारंपरिक प्रसंगांसाठी टाय आपणास एक चांगला लूक प्रदान करते.सेव्हन फोल्ड (सातकप्पी)या प्रकारचा टाय सिल्क कापडापासून बनविण्यात येत असून स्ट्रिप्स, डॉट्स, चेक्स आदी विविध प्रकारच्या डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच यात वापरण्यात येणाऱ्या मटेरियल्समुळे याची किंमतदेखील जास्त असते. हा टाय दिसायला खूप आकर्षक असल्याने कार्यालयात किंवा विशेष प्रसंगी वापरल्यास आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा हटके दिसते. अ‍ॅक्रॅलिकया प्रकारचा टाय सध्या बॉलिवूडमधील अभिनेते आवर्जून वापरत असल्याने खूप लोकप्रिय ठरत आहे. यास क्लिप आॅन टाय असेही म्हटले जाते. या अ‍ॅक्रॅलिक टायमुळे काचेचा टाय लावल्यासारखेच आपल्याला वाटते. औपचारिक प्रसंगांमध्ये आणि पार्टीमध्ये हा टाय उठून दिसतो.बोव्हसेलिब्रेटींच्या अथवा विविध प्रकारच्या पार्ट्यांमुळे बोव्ह टाय खूपच प्रसिद्ध आहे. दक्षिणी देशात प्रचलित सूटवर तर हा टाय अधिकच शोभून दिसतो. प्लेन किंवा चेक्स डिझाइनमध्ये उपलब्ध असणाºया या टाय औपचारिक किंवा विशेष प्रसंगांबरोबर नाईट किंवा कॉकटेल पार्टीमध्येही आपल्याला एक वेगळा लूक प्रदान करतात. क्लासिक बोव्ह टायच्या बदलाचा एक प्रकार असलेल्या या वेस्टर्न बोव्ह टायला साऊथवेस्ट किंवा वेस्ट बोव्ह टाय असेही म्हणतात. सिल्क, पॉलिस्टर, कॉटन, लोकर अशा मटेरिअल्सपासून बनविल्या जाणाऱ्या या टायचा एक मजेशीर भाग म्हणजे या टायकडे बघून कर्नल सँडर्सची आठवण येते. साऊथवेस्ट बोव्ह टाय ही नैऋत्येकडील देशांमध्ये औपचारिक प्रसंगांसाठी अजूनही प्रचलित आहे.नेकरचीफनेकरचीफ म्हणजे फॉर्मल टाय. हा तरुणाई तसेच किशोरवयीन मुलांमध्ये खूपच प्रचलित आहे.  सर्वसाधारणपणे हा टाय गणवेशावर परिधान केली जात असल्याने कार्यालय अथवा औपचारिक प्रसंगांमध्ये उठून दिसत नाही. मात्र प्लेन, चेक्स किंवा डिजिटल प्रिंट अशा वैशिष्टयपूर्ण डिझाइन्समध्ये उपलब्ध असणारा नेकरचीफ दररोजच्या जीवनात एक वेगळा लूक देते.बोलोसत्तरच्या दशकात उदयास आलेला बोलो टाय कॉईन्स, पिन्स आणि क्रिसमस ट्रीमधील अलंकार, चुंबक अशा निरनिराळ्या वस्तूंपासून बनविला जातो. पुरुषांच्या गळ्यातील दागिन्यांसारख्याच दिसणारा हा टाय परदेशात अजूनही खूप लोकप्रिय आहे.ravindra.more@lokmat.com