शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंडर टू स्पाईक हेअर स्टाईलचे तरुणाईत फॅड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:10 IST

आपले व्यक्तीमत्त्व हे आकर्षक व उठवून दिसण्यासाठी हेअर स्टाईल ही खूप आवश्यक आहे

. कुठलाही ड्रेस परिधान केला असेल  किंवा कितीही मेकअप केला  असेल. पण हेअर स्टाईल व्यवस्थीत नसेल तर आपला लूक हा व्यवस्थीत वाटत नाही. त्यामुळेच विविध प्रकारच्या हेअर स्टाईल केल्या जातात. सध्या तरुणाईमध्ये अंडर टू स्पाईक या हेअरस्टाईलचे फॅड लागल्याचे दिसून येते. अलीकडे बॉलीवूडच्या  अनेक चित्रपटात बडे स्टारही या स्टाईलमध्येच वावरताना दिसतात. त्यामुळे तरुणाईमध्ये दिवसेंदिवस ती जास्तच फेमस होत आहे.कशी असते अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल या हेअरस्टाईलमध्ये कानाजवळील केसाच्या दोन्हीही बाजूने अतिशय बारीक केस असतात. त्या बारीक केस असलेल्या  जागेवर आपल्याला आवडणारे एखादे नाव, टॅटू अशी  कोणतीही डिझाईन करता येते. ही हेअर स्टाईल साधारणत : एक ते दीड महिन्यापर्यंत चालते. जेल, कलरिंग, डॅक्स, हेअर स्प्रे याचा वापर करण्याची यासाठी कोणतीच आवश्यकता नाही. हटके व्यक्तिमत्त्वासाठीसध्या सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे अनेकांना आपली हेअर स्टाईल मेटेंन ठेवता येत नाही. परंतु, आपण हेल्मेट जरी वापरात असला तरीही  अंडर टू स्पाईकमध्ये  केस छोटे असल्याने आपल्याला ती मेटेंन ठेवता येते.  यामुळे इतरांपेक्षा आपले व्यक्तीमत्त्च हे हटके वाटते.पार्टी, स्पोर्ट व आॅफिस अशा कुठल्याही ठिकाणी ही हेअर स्टाईल कुठल्याही ड्रेसवर सूट होते . या फॅडमुळे तरुणाईची केस वाढविण्याची स्टाईलच जवळपास नाहीशी झाली आहे. सलूनमध्ये जाणारे जास्तीत जास्त तरुण या स्टाईलच पसंती देत आहेत.घरच्या घरी करु शकताअंडर टू स्पाईक ही हेअर स्टाईल्स करण्यासाठी तुम्हाला सलूनमध्येच जाण्याची आवश्यकता नाही. तर घरच्या घरीही स्वत : च्या हाताने तुम्ही ही स्टाईल करु शकता. अशी ही सर्वसामान्यांना परवडेल अशी स्टाईल आहे.पावसाळ्यात उपयुक्तपावसाळ्यात केस ही छोटी असणे आवश्यक आहेत. के स मोठे असल्यावर पावसात भिजल्यानंतर आजारी पडण्याचे लक्षणे अधिक असतात. छोटे केस हे लवकर कोरडे करता येत असल्याने आजारी पडण्याची भिती फार कमी असते. त्यामुळे पावसाळ्यात अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल ही खूपच उपयुक्त आहे. यामुळे डोक्यात पिंपल्स, कोंडा होत नाही. उलट मोठ्या केसांमुळे स्कॅल्प लूज होऊन, मेटेंनसचाही प्रॉब्लेम उद्भवतो. तसेच  डोळ्यावरही त्याचा परिणाम  होतो. या फॅशनमुळे शाळांमध्येही अलीकडे शिक्षकांना केस कमी करावे हे मुलांना सांगण्याची गरज नाही.बॉलीवूड स्टारही अंडर टू स्पाईक मध्येहल्लीला अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल ही केवळ तरुणाईमध्येच नाही. तर बॉलीवूड स्टार मध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित सुल्तान या चित्रपटात पहिलवानाच्या भूमिकेत असणारा  सलमान खान सुद्धा याच हेअर स्टाईलमध्ये आहे. तसेच गतवर्षी रिलीज झालेल्या ए.आर. रहमान यांचे संगीत असलेल्या तमाशा या चित्रपटाही रणबीर कपूर याच हेअर स्टाईलमध्ये होता. तमाशापासून तरुणाईत या स्टाईलचे फॅड आले आहे. यासह बॉलीवूडचे अन्य कलाकारही याच हेअर स्टाईलमध्ये दिसून येतात.