पगारासोबत दोन एकर जमीनही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 17:03 IST
कॅनडामध्ये एका दुकानात चांगले कर्मचारी मिळावे, याकरिता ही जाहिरात फेसबुकवर देण्यात आली आहे
पगारासोबत दोन एकर जमीनही !
आपला उदरनिर्वाह चालावा याकरिता प्रत्येकाला चांगली नोकरी असावी असे वाटते. त्याकरिता प्रत्येकजण तसा प्रयत्नही करतो; परंतु या नोकरीच्या पगाराबरोबरच दोन एकर जमीन ही कायमस्वरूपी दिली जाईल! हे वाचून आश्चर्य वाटू देऊ नका तर कॅनडामध्ये एका दुकानात चांगले कर्मचारी मिळावे, याकरिता ही जाहिरात फेसबुकवर देण्यात आली आहे. कर्मचाऱ्याची येथे निवड झाली तर त्याला पगारासोबतच दोन एकर जमीनही दिली जाणार आहे.कॅनडा हा देश श्रीमंत असून, नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात आहे; परंतु माणसे मिळत नाहीत त्यामुळे ही जाहिरात देण्यात आली आहे. ज्यांची याकरिता निवड होईल, त्यांना दोन एकर जमीन देण्यात येणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने पाच वर्षांहून अधिक काळ येथे काम केले तर त्यांच्या नावावरही ही जमीन के ली जाईल, असाही जाहिरातीत उल्लेख आहे. याकरिता अनेकजणांनी अर्ज केले असून, सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. याकरिता आतापर्यंत आलेल्या अर्जामधून काही मुलींची निवडही करण्यात आली आहे.