TRICKS : वाय-फाय स्पीड वाढवा या सोप्या ट्रिक्सने !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:08 IST
बऱ्याचदा आपणास इंटरनेटचा खूपच कमी स्पीड मिळतो. तर आज आपण वाय-फाय स्पीड कसा वाढवावा हे अगदी सोप्या ट्रिक्सने जाणून घेऊया.
TRICKS : वाय-फाय स्पीड वाढवा या सोप्या ट्रिक्सने !
-Ravindra Moreइंटरनेट आज सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे आणि विशेष म्हणजे त्यात स्पीडची काय भूमिका असते हे आपण समजू शकत नाही. इंटरनेटसाठी कमाल लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर होतोय आणि स्पीडसाठी वाय-फाय. मात्र बऱ्याचदा आपणास इंटरनेटचा खूपच कमी स्पीड मिळतो. तर आज आपण वाय-फाय स्पीड कसा वाढवावा हे अगदी सोप्या ट्रिक्सने जाणून घेऊया. वाय-फाय राऊटरला घरात ठेवतेवेळी काही लहान गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. हे राऊटर सर्व दिशांमध्ये आपले सिग्नल पाठवितात यासाठी त्याला कोणत्याही भिंती शेजारी ठेवू नका. शक्य असेल तर वाय-फाय राऊटरला घरात अशा ठिकाणी ठेवा जेथून संपूर्ण घरात सिग्नल मिळतील. बाहेरुन येणारे काही टेलिफोनच्या तार घराच्या ज्या ठिकाणी येत असतील, त्याठिकाणी राऊटर ठेवल्यास चांगल्या प्रकारे सिग्नल मिळतात. सध्या बाजारात येणाऱ्या नवीन राऊटरमध्ये कित्येक नवीन फीचर्स समाविष्ट असतात. अशा अपडेट्सवर नक्कीच लक्ष असूद्या. कारण यामुळे आपल्या इंटरनेट ब्राऊजिंगवर चांगला परिणाम होऊ शकतो. राऊटरचे सिग्नल वेगवेगळे रेडिओ सिग्नल देतात. आपले स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि अन्य डिव्हाईस या रेडिओ सिग्नलला कनेक्ट करून इंटरनेटला कनेक्ट करतात. यासाठी कित्येकदा पासवर्डमध्येही बदल करावा लागतो. कधी-कधी हाय गेन अँटेना लावून राऊटरची क्षमता वाढवू शकता. जर असे करणे आपल्यासाठी सोपे नसेल तर आपण वाय-फाय एक्सटेंडेरदेखील खरेदी करू शकता. फक्त त्याला एका विद्युत प्लगशी कनेक्ट करा. हे आपोआपच सिग्नलसाठी आपल्या राऊटरला कनेक्ट करुन घेते. यानंतर ज्याठिकाणी आपल्याला सिग्नल मिळत नव्हते त्याठिकाणीही सिग्नल मिळतील. हे सर्व करताना आपल्या राऊटर सिक्युरिटीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण वाय-फाय एक्सटेंडेरचा वापर करत असाल तर त्यासोबत एक पासवर्डदेखील गरजेचा आहे. असे केले नाहीतर कोणीही अनोळखी व्यक्ती कनेक्ट होऊ शकतो.