शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

3 हजार जोड्यांचा एकत्र विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 02:02 IST

दक्षिण कोरियामध्ये पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळ्यात 62 देशांतील तीन जोडप्यांनी एकत्र लग्नगाठ बांधली.

साऊथ कोरियामध्ये नुकतीच निराळी घटना पाहायला मिळाली. सामुदायिक विवाह सोहळे तसे नवीन नाहीत. मात्र, दक्षिण कोरियामध्ये पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळा विशेष ठरला. कारण या सोहळ्यात 62 देशांतील तीन जोडप्यांनी एकत्र लग्नगाठ बांधली.रेव्हरंड सुन म्युंग मून यांनी स्थापना केलेल्या युनिफि केशन चर्चतर्फे हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सेऊलपासून 75 किमी दूर गॅप्येयाँग शहरामध्ये चर्चच्या चेआँगशिम पीस वर्ल्ड सेंटर येथे हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. तीन हजार जोडप्यां व्यतिरिक्त आणखी  जगभरातील 12 हजार जोडप्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या सोळ्यात सहभाग नोंदविला, अशी माहिती दक्षिण कोरिया मुख्यालयाचे संचालक ऱ्यू क्येऊंग-सेउक यांनी दिली.2012 साली मून यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. साठाव्या दशकापासून ते सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करत असत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हाक जा हॅन मून यांनी सर्व विधी पार पाडले. यावेळी चर्चचे 22 हजार अनुयायी आणि पाहुणे उपस्थित होते.या तीन हजारांपैकी एक हजार नवविवाहित जोडपी होती तर इतर दोन हजार जोडप्यांनी चर्च जॉईन करण्यापूर्वी लग्न केले होते म्हणून आशीर्वाद मिळविण्यासाठी पुन्हा लग्नविधी केला. इंग्लंडहून आलेला ह्यो-जू साँगने एका जपानी मुलीशी लग्न केले. तो म्हणतो, आम्ही एक वर्षांपासून एन्गेज्ड होतो. परतु एकमेकांपासून दूर राहायचो. अशा अविस्मरणीय पद्धतीने विवाह करून नेहमी सोबत राहणार यापेक्षा मोठा आनंद कोणता?