शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

​तिळगूळ घ्या गोड गोड बोला..., आप्तेष्टांना द्या गोड शुभेच्छा !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:11 IST

जुने झाले गेले विसरुन पुन्हा नव्याने मैत्री-नाते जोडण्याचा मकरसंक्रांत हा गोड सण आहे. यादिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन गोड शुभेच्छा दिल्या जातात.

-रवीन्द्र मोरे जुने झाले गेले विसरुन पुन्हा नव्याने मैत्री-नाते जोडण्याचा मकरसंक्रांत हा गोड सण आहे. यादिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन गोड शुभेच्छा दिल्या जातात. मात्र जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून दूर असाल, तुमचे मित्र परगावी असतील तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसने शुभेच्छा देण्यास विसरू नका.* तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा* गुळाची गोडी.. त्याला तिळाची जोडी.. नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा सुंगध मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!* उडवू पतंग जमवून सवंगडी, आवडीने चाखू तिळगुळाची गोडी* आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा!तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला!* एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला.खुद्कन हसला, हातावर येताच बोलू लागला..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!* मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!* तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडूमधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!* तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!* नात्यातील कटुता इथेच संपवाङ्घ.तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!* झाले, गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!* मनात असते आपुलकी, म्हणुन स्वर होतो ओला.. हलवा, तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला!* मांजा, चक्री, पतंगाची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्ज्त न्यारी, पतंगाप्रमाणे घ्या आकाशी भरारीतिळगुळ घ्या गोड गोड बोला!!* अखंड राहो तुमची जोडीहीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी!तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!* नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!* तिळाचे आणि गुळाचे होता मनोमिलन, बनला गोड लाडू, देऊन एकमेका तीळगुळ नाती नवी जोडू