शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

फॅशनच्या जगातही टायगर प्रिंटसचा रूबाब. पण तो तुम्ही करून बघितला का?

By admin | Updated: May 23, 2017 18:44 IST

वाघाची कातडी जशी असते अगदी तंतोतंत तशीच प्रिंट असलेले कपडे घालून चारचौघात मिरवणं अगदी कोणत्याही ऋतूत छान, रिच आणि रॉयलच वाटते.

 

- मोहिनी घारपुरे- देशमुख

 वाघाची कातडी अंगावर घेऊन एकेकाळी माणूस आपलं निसर्गापासून संरक्षण करीत असे हे तर सर्वांना माहितच आहे. त्यानंतर काळ लोटला, अनेक वर्ष लोटली. माणूस प्रत्यक्ष स्वत: वस्त्र, कापड तयार करून त्या कापडाचे पोषाख, पेहराव करू लागला. मात्र तरीही वाघाच्या कातडीची आणि प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांची जागा त्याच्या मनात कायमच राहिली. त्यामुळेच गेली कित्येक वर्ष फॅशनच्या जगतात. टायगर प्रिंट्सच्या कपड्यांची क्रेझ  टिकून आहे. टायगर प्रिंट्सचे कपडे घालून मिरवावंस वाटणं हे खरंतर विशेषच. वाघाची कातडी जशी असते अगदी तंतोतंत तशीच प्रिंट असलेले कपडे घालून चारचौघात मिरवणं अगदी कोणत्याही ऋतूत छान, रिच आणि रॉयलच वाटते. सेक्सी दिसण्यासाठीही कित्येकदा या टायगर प्रिंट्सच्या कपड्याला पसंती दिली जाते. त्याचबरोबर फरचे कपडे, फरची किनार असलेले जॅकेट्स, ड्रेसेस, श्रग्स, आदी तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यांना परदेशातील स्त्रीयांच्या वॉर्डरोबमध्ये स्थान मिळतंच .

 

                  

आपल्याकडेही फरचे कपडे आणि टायगर प्रिंट्सची चलती आहे. त्यातूनही हे कपडे कोणत्याही ॠतूत घालता येत असल्यानं या प्रिंट्सचा किमान एखादा तरी कपडा आपल्या वॉर्डरोबमध्ये असलाच पाहिजे असं वाटतं. सध्या बाजारात टायगर प्रिंट्सचे पाश्चात्य धाटणीचे टॉप्स, मॅक्सी, वनपीस वगैरे जोरदार विकले जात आहेत. इतकंच नव्हे तर चपलांवर किंवा टी-शर्टवर वाघ, सिंहाची चित्रं असतात. लहान मुलांच्या कपड्यांमध्येही या वाघ,सिंहाच्या चित्रांचा आणि प्रिंट्सचा अगदी खूबीनं वापर केला जातो. जेणेकरून लहान मुलांना त्याचं आकर्षण वाटावं. तसेच महिलांच्या साड्यांवरही टायगर प्रिंट्स उमटल्या वाचून राहिलेल्या नाहीत. मग असल्या या रॉयल आणि आकर्षक लुक देणाऱ्या टायगर प्रिंट्सचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्येही असायलाच हवेत. अगदी आवर्जून!

 

        

थ्रीडी प्रिंट्स

दोन तीन वर्षांपूर्वीपासून फॅशनच्या दुनियेत थ्री डी प्रिंट्सनी देखील धुमाकूळ घातला आहे. या प्रिंट्स थ्री डायमेन्शनल असल्यानं त्यांचा लुक एकदमच भारी दिसतो. अनेक आंतरराष्ट्रीय डिझायनर्स या थ्री डी प्रिंट्समध्ये नवनवीन प्रकार आणत आहेत तर अनेकजण त्यावर अजून संशोधन करून पेहरावांमध्ये वैविध्यता आणत आहेत. सध्या बाजारात थ्री डी टी-शर्ट आणि टॉप्सची चलती आहे.