हजारोंवर्षांपूर्वीही मानवाने केली जंगलतोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:01 IST
जनावरांसाठी कुरण आणि लोकवस्तीसाठी सुरक्षित जागा तयार करण्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली.
हजारोंवर्षांपूर्वीही मानवाने केली जंगलतोड
ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण मागच्या शंभर वर्षांमध्ये अधिक झाले आहे. परंतु याची सुरूवाती काही हजारो वर्षांपूर्वी झाली होती, असा निष्कर्ष नव्या रिसर्चमधनू निघाला आहे. मादागास्कार भागातील एक हजार वर्षांपूर्वी जंगले नामशेष होण्यामागे नैसर्गिक आपत्ती नाही तर मानव जबाबदार आहे. राहण्यासाठी जागा आणि जनावरांना कुरण मिळण्यासाठी मानवाने वृक्षतोड आणि आग लावून जंगल नष्ट केले.मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी (एमआयटी) येथील सहायक प्राध्यापक डेव्हिड मॅकगी यांनी केलेल्या संशोधनात दोन गुहांमध्ये सापडलेल्या चुनखडी थरातील घटकपदार्थांचे विश्लेषण केले असता आढळून आले की शेती, जनावरांसाठी कुरण आणि लोकवस्तीसाठी सुरक्षित जागा तयार करण्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली.चुनखडीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट ऐवजी झाडाझुडपांमध्ये आढळणारे कार्बन आयसोटोप्स आढळून आले. गुहेत सापडणारे चुनखडीचे थर हे हजारो वर्षे जसास तसे टिकून राहतात. त्यांचे घटकपदार्थ इतिहास संशोधकांसाठी मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडतात. मादागास्कर भागात सुमारे एक हजार वर्षांपूर्वी मानवाची भटकंती थांबून एका जागी स्थिरावण्यासाठी तो शेतीप्रधान झाला, अशी माहिती मॅसेच्युएट्स विद्यापीठातील प्राध्यापक लॉरी गॉडफ्रे यांनी दिली.