शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

वॉर्डरोबमध्ये साड्यांची श्रीमंती हवी असेल तर पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या या साड्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:17 IST

साड्या घेण्याआधी साड्यांच्या प्रकाराची थोडी माहिती असायला हवी. माहिती असली की आपल्याकडे जो नाही त्या प्रकारातली साडी घेता येते. यामुळे वॉर्डरोबमध्ये साड्या केवळ संख्येनं वाढत नाही तर गुणवत्तेनंही वाढतात.

ठळक मुद्दे* संपूर्ण भारतभर लोकप्रिय असलेली कांथा साडी टी वस्त्रावर केलेल्या भरतकामाचा प्रकार आहे.* सुंदर रंगसंगती, आकर्षित डिझाइन्समुळे तांत साड्या सुरेख दिसतात.* बोमकाई साडी ओडिशा राज्याची शान आहे.

- सुनिता विगअनेकजणींना साड्या घेण्याची भारी हौस. आपला वॉर्डरोब कसा साड्यांनी खचाखच भरलेला आवडतो त्यांना. पण आपल्या वॉर्डरोबमध्ये फक्त एकच एक प्रकार असून काय उपयोग? वॉर्डरोबमध्ये व्हरायटी हवी. आता तर सणावारांचे दिवस. नटण्या-मुरडण्याचे आणि मिरवण्याचे दिवस. साड्यांची व्हरायटी वापरून बघण्याचा उत्तम काळ आहे हा. तसेच साड्या घेण्याचं निमित्तही हे सणवार देतात. त्यामुळे साड्या घेण्याआधी साड्यांच्या प्रकाराची थोडी माहिती असायला हवी. माहिती असली की आपल्याकडे जो नाही त्या प्रकारातली साडी घेता येते. यामुळे वॉर्डरोबमध्ये साड्या केवळ संख्येनं वाढत नाही तर गुणवत्तेनंही वाढतात. आणि आपला वॉर्डरोब खर्या अर्थानं समृध्द होतो.वॉर्डरोब समृध्द आणि श्रीमंत करणारे साड्यांचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?पूर्वेकडची साडी समृध्दी‘कोलकाता’ पूर्व भारताची फॅशन कॅपीटल. ती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपण ज्याला कलकत्ता साडी म्हणतो या तशा खास सुती साड्या व्यतिरिक्तही अनेक प्रकार तिथं वर्षानुवर्ष प्रचलित आहेत.

 

कांथा साडी

संपूर्ण भारतभर लोकप्रिय असलेली कांथा साडी टी वस्त्रावर केलेल्या भरतकामाचा प्रकार आहे. रंगीबिरंगी धागेदोरे द्वारा साधा धावदोरा माध्यमातून साडीला किती सुंदर सुरेख उठाव येवू शकतो हे या कांथा साड्या बघून पटत. कॉटन, अस्सल सिल्क (रेशमी), अलिकडे सिंथेटिक ही कांथा साड्यामध्ये लोकप्रिय आहे. लोककथामधले प्रसंग, राधा-कृष्ण, मीरा, पशु-पक्षी, फुलं-पानं, नक्षीदार वेली, मानवी आकृतीचं भरतकाम कांथावर्कद्वारे वस्त्रावर करून त्यालाच कांथासाडी म्हटलं जातं. पश्चिम बंगालमधील ग्रामीण स्त्रियांना या कांथा साडीच्या लोकप्रियतेमुळे चांगला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

 

तांत साडी

कॉटन साडी नेसणार्या महिलांची पहिली पसंती. ‘हॅण्डलूम’ म्हणजे मागावर विणलेली ही साडी तलम आणि सूती असते. सुंदर रंगसंगती, आकर्षित डिझाइन्समुळे या साड्या सुरेख दिसतात.

 

बालुचेरी साडी

लाल, जांभळा, निळा या रंगछटाच्या रेशमापासून बालुचेरी साडी तयार केली जाते. दोनशे वर्षांचा इतिहास असलेली बालुचेरी साडी मुर्शिदाबाद जिल्ह्यात हातमागावर विणल्या जातात. रामायण, महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथामधील कथाप्रसंगाची चित्रं पदरावर तर काठावर बारीक बुट्टे, नक्षी, फुलापानांची कलाकुसरी शोभून दिसते.

 

बोमकाई साडी

ओडिशा राज्याची शान असलेली ही साडी. ती बनवण्यासाठी जाडसर (भरड) सूत वापरलं जातं. ज्यामुळे साडीचा पोत जाडसर असतो. सहसा गडद रंगाचा वापर केला जातो. ओडिशाची आणखी एक प्रसिद्ध साडी म्हणजे संबळपुरी. सुती, टसर आणि रेशमी या प्रकारामध्येही साडी उपलब्ध असते हिलाच ‘इक्कत’ म्हणून ही ओळखलं जातं.पश्चिमेकडची साडी श्रीमंती

पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्राबरोबर गुजरात, राजस्थानही समाविष्ट आहेत. महाराष्ट्राचे राजेशाही वैशिष्ट्य म्हणजेच ‘पैठणी साडी’. ही साडी हातमागावर विणली जाणारी रेशमी साडी आहे. ती पूर्णत: क्लासिक टच क्लासिक लूक देते. फुलं- पानं, नक्षीकाम, मोर आणि अन्य पशुपक्षांची डिझाईन्स यावर आढळतात.

 

 

राजस्थानची बांधणी साडी

‘टाय अ‍ॅण्ड डाय’द्वारे सूती, रेशमी कपड्यांवर विशिष्ट दोर्यानं गाठी मारून डिझाइन्स तयार केले जाते. विविध डिझाइन्स आणि त्यावर भरतकाम, जरदोसी वर्क, रेशमी धाग्यांची कलाकुसरद्वारे या साडीला प्रत्येक वेळी नवीन आकर्षित रूप दिलं जातं.

महाराष्ट्रातील नऊवारी साडी

खणाचे ब्लाऊज जणू पारंपरिकतेचे प्रतिक आहे. ज्यामध्ये योद्धा गृहिणी आणि सौंदर्यवतीचं सौंदर्य लपलेलं आहे. तसेच राजस्थानची घाघरा साडी ही बंधेज आणि जरीबॉर्डरसह असलेली टि.व्ही. सिरीयलमधल्या कलाकारांची खास पसंती आहे.