TECH : आता डेस्कटॉपवरही फेसबुक लाईव्ह व्हिडिओचा आनंद घेता येणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:58 IST
लवकरच डेस्कटॉपवर फेसबुक वापरणाऱ्यासाठी ही सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
TECH : आता डेस्कटॉपवरही फेसबुक लाईव्ह व्हिडिओचा आनंद घेता येणार !
सध्या मोबाइलच्या माध्यमाने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओचा आनंद सर्वचजण लुटत आहे. मात्र अद्याप या सुविधेचा लाभ डेस्कटॉपधारक घेऊ शकत नाहीत. मात्र लवकरच डेस्कटॉपवर फेसबुक वापरणाऱ्यासाठी ही सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. डेस्कटॉपवरील वेबकॅम वापरून युजर्स लाईव्ह व्हिडिओ ब्रॉडकास्ट करू शकतील.फेसबुक ब्लॉगवरून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फेसबुक लाईव्ह हा पर्याय डेस्कटॉपवर फक्त पेजेससाठी मर्यादित होता. आता स्टेटस अपडेट कंपोजरवर लाईव्ह बटणही दिसेल. फेसबुक लाईव्हचा पर्याय डेस्कटॉपसाठी सुरू करून फेसबुकने ट्विटर व पेरिस्कोपला मागे टाकत यूट्यूबशी स्पर्धा सुरू केली आहे. प्रश्नोत्तरांसाठी व जेथे हातात फोन धरणे सोयीचे नसते अशा परिस्थितीत वापरण्यासाठी डेस्कटॉप स्ट्रीमिंग उपयोगी ठरेल. डेस्कटॉप व्हिडिओवरील आशय फारसा प्रभावी नसण्याची शक्यता व फेसबुक लाईव्हमुळे हिंसक व्हिडिओच्या होत असलेल्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न अजूनही सुरू असताना डेस्कटॉपवर सुरू करण्यात येणारी ही सेवा कदाचित घाईत घेतलेला निर्णय ठरू शकते.