शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

TECH : ​'स्क्रिनशॉट' कसा घ्याल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 13:03 IST

आपण फक्त ‘स्क्रिनशॉट’ हे नाव ऐकतो, मात्र तो कसा घ्यायचा हे आपणास माहित नसते. आपल्या जवळ स्मार्टफोन अथवा संगणक असते मात्र स्क्रिनशॉट घेता येत नसल्याने आवश्यक माहिती किंवा चित्र गरजेचे असूनही ते साठवून ठेवू शकत नाही.

-Ravindra Moreआपल्या संगणकाच्या किंवा स्मार्टफोनच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे यास ‘स्क्रिनशॉट’ घेणे असे म्हणतात. बहुतांश स्क्रिनशॉटचा वापर आपल्या अडचणी सोडविण्यासाठी, स्क्रिनवरील मजकूर किंवा चित्र साठवून ठेवण्यासाठी केला जातो. बऱ्याचदा आपण फक्त ‘स्क्रिनशॉट’ हे नाव ऐकतो, मात्र तो कसा घ्यायचा हे आपणास माहित नसते. आपल्या जवळ स्मार्टफोन अथवा संगणक असते मात्र स्क्रिनशॉट घेता येत नसल्याने आवश्यक माहिती किंवा चित्र गरजेचे असूनही ते साठवून ठेवू शकत नाही. * संगणकावर स्क्रिनशॉट कसा घ्याल?सर्वसाधारणपणे आपण सगळेच आपल्या संगणकावर विंडोज ही आॅपरेटींग सिस्टीम वापरतो. तेंव्हा मी त्या अनुशंगाने ही माहिती सांगत आहे. आपल्या संगणकाच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे, स्क्रिनशॉट घेणे हे अत्यंत सोपे आहे. आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील prt sc (पीआरटी एससी) बटण दाबायचे. असे केल्याने सहज स्क्रिनशॉट निघतो. *आता हा स्क्रिनशॉट साठवायचा कसा? Windows च्या प्रत्येक संगणकात पूवीर्पासूनच Paint (पेंट) नावाचे एक सॉफ्टवेअर असते. ते सॉफ्टवेअर उघडा. Paint सापडत नसल्यास विंडोजच्या सर्चमधून त्याचा शोध घ्या. हे सॉफ्टवेअर उघडल्यानंतर आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील ctrl हे बटण दाबून ठेवत v हे बटण दाबायचे आहे किंवा सरळ राईट क्लिक करुन Paste या पयार्याची निवड करा. आपला स्क्रिनशॉट आपल्याला Paint मध्ये दिसू लागेल. आता हा स्क्रिनशॉट Save करा. अशाप्रकारे आपण अगदी सहजतेने आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट घेतलेला आहे.* स्मार्टफोनवर स्क्रिनशॉट कसा घ्याल?स्मार्टफोनवरुन स्क्रिनशॉट घेणे तर प्रचंड सोपे आहे. आपल्या स्मार्टफोनवर Volume (व्हॉल्यूम) आणि Power (पॉवर) असे दोन स्वतंत्र बटण असतील. आपल्याला केवळ एव्हढेच करायचे आहे की, व्हॉल्यूम बटणावरील गाण्याचा आवाज कमी करण्याकरीता वापरली जाणारी बाजू आणि पॉवरचे बटण हे एकाचवेळी एकत्रितपणे दाबायचे आहेत. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट निघेल. हा स्क्रिनशॉट आपल्या फोनवरील फोटो गॅलरीत आपोआप साठवला जाईल, तेंव्हा आपणास स्वतंत्रपणे काही करण्याची आवश्यकता नाही.आपल्या फोनच्या फोटो गॅलरीत जाऊन आपण तो स्क्रिनशॉट पाहू शकाल.