TECH : ‘जिओ’चा 4जी स्वस्त लॅपटॉप लवकरच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 17:05 IST
एकापेक्षा एक सरस आॅफर देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात 4जी लॅपटॉप घेऊन येत आहे
TECH : ‘जिओ’चा 4जी स्वस्त लॅपटॉप लवकरच !
आपल्या यूजर्सला एकापेक्षा एक सरस आॅफर देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात 4जी लॅपटॉप घेऊन येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4जी सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे. ‘फॉक्सकॉन’ ही कंपनी या लॅपटॉपची निर्मिती करणार असून हा लॅपटॉप 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार आहे. शिवाय व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरादेखील असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.