शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

TECH : अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलला अजून करुया सुरक्षित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 18:31 IST

अ‍ॅण्ड्रॉइडचा मुख्य आधार असलेले ‘गुगल खाते’ चुकूनही इतरांच्या हातात पडले तर, त्याचा किती दुरुपयोग होऊ शकतो..

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोय. आपला हा अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन अधिकच स्मार्ट बनत चालला आहे. कारण हल्ली कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात.मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाइलना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अ‍ॅण्ड्रॉइडचा मुख्य आधार असलेले ‘गुगल खाते’ चुकूनही इतरांच्या हातात पडले तर, त्याचा किती दुरुपयोग होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे आपल्या गुगल खात्याला ‘द्विस्तरीय सुरक्षा’ (टू फॅक्टर आॅथंटिकेशन) असणे महत्त्वाचे आहे.द्विस्तरीय सुरक्षा पद्धती अतिशय उपयुक्त आहे. या रचनेमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी नवीन ठिकाणाहून किंवा नवीन उपकरणावरून गुगल खाते सुरू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला पासवर्डसोबतच आपल्या मोबाइलवर आलेला सहा अंकी कोडक्रमांकही सोबत टाकावा लागतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड माहीत असला तरी, या सहा अंकी कोडशिवाय ती व्यक्ती तुमचे गुगल खाते सुरूच करू शकणार नाही. अशी सुरक्षा व्यवस्था कशी तयार करायची ते आपण जाणून घेऊ.कशी कराल ‘द्विस्तरीय सुरक्षा’आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘गुगल’ हा पर्याय निवडा. त्यामध्ये ‘साइन इन अ‍ॅण्ड सिक्युरिटी’वर क्लिक करा. तुम्ही ‘वेब ब्राऊजर’मध्ये जाऊन ‘गुगल अकाऊंट सिक्युरिटी’ वेबसाइटवरूनही ही प्रक्रिया करू शकता.‘गेट स्टार्टेड’वर क्लिक करा. या वेळी तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड विचारला जाईल. तो नमूद करा.या ठिकाणी अ‍ॅड रिकव्हरी इन्फर्मेशनच्या पर्यायात ‘अ‍ॅड फोन’चा पर्याय निवडा. त्यात तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवा. काही क्षणातच या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ‘गुगल’कडून सहा अंकी ‘व्हेरिफिकेशन कोड’ मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा वेगळ्या ठिकाणाहून किंवा उपकरणावरून ‘गुगल खाते’ सुरू करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला नवीन ‘व्हेरिफिकेशन कोड’ पाठवण्यात येईल.सतर्क रहा* तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये ‘साइन इन अ‍ॅण्ड सिक्युरिटी’ पेजवर जा. त्यामध्ये ‘रिसेन्टली यूज्ड डिव्हायसेस’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच, तुम्हाला तुमचे गुगल खाते ‘सक्रिय’ राहिलेल्या संगणकांच्या आयपी अ‍ॅड्रेस आणि ठिकाणांची माहिती मिळते.