Teach : कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 14:47 IST
गुगल प्ले स्टोरमध्ये आता असे अॅप आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला वेगळाच नंबर दिसेल.
Teach : कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर !
बऱ्याच आपण आपल्या परिचित किंवा अपरिचित व्यक्तीला प्रॅँक कॉल करण्याचा प्रयत्न करतो, मात्र ट्रुकॉलर अॅपमुळे आपण सापडतो. मात्र गुगल प्ले स्टोरमध्ये आता असे अॅप आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला वेगळाच नंबर दिसेल. ‘टेक्स्ट मी’ नावाचे हे अॅप असून या अॅपने तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि समोरच्याला तुम्ही कॉल किंवा मॅसेज केला आहे हे समजणारदेखील नाही. या अँपच्या मदतीने यूजर अनेक नंबर सेट करू शकतो. तुम्ही कोणताही नंबर सेट करू शकता. जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा तुमचा नंबर न दिसता तुम्ही सेट केलेला नंबर समोरच्या व्यक्तीला दिसेल. एकच नंबर जर सेट केला तर हे अॅप आहे. मात्र एकहून अनेक नंबर वापरायचे असल्यास महिन्याला ६० रुपए भरावे लागतील. Also Read : Tech : अशी मिळवा कोणत्याही नंबरची ‘कॉल डिटेल’, सोपी आहे प्रोसेस !