शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सेल्फी काढा, पण जबाबदारीने वागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:09 IST

सेल्फी बळीच्या अनेक घटना आपण एव्हाना ऐकल्या असतील... तरीही लोक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. समुद्राच्या ठिकाणी, बोटिंग करताना, धावत्या ट्रेनसमोर, धबधबे किंवा टोकावर उभे राहून सेल्फी काढणे आणि त्यातून आनंद मिळविणे ही स्टाईल आजच्या तरुणाईसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.

 समुद्राच्या ठिकाणी, बोटिंग करताना, धावत्या ट्रेनसमोर, धबधबे किंवा टोकावर उभे राहून सेल्फी काढणे आणि त्यातून आनंद मिळविणे ही स्टाईल आजच्या तरुणाईसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. सेल्फीच्या हव्यासापोटी साहसी ठिकाणी फोटो काढण्याचा मोह अनावर होत असल्यामुळे तरुणाईसाठी हाच सेल्फी त्यांच्या आयुष्याचा अगदी शेवटचा क्षण ठरू लागला आहे. त्यामुळे सेल्फीचा खरा आनंद नेमका कशात आहे? याचा शोध आजच्या तरुणाईने घेणे गरजेचे झाले आहे.सोशल मीडियावर सतत कनेक्ट राहण्याच्या नादात तरुणाई बरेचदा आपला जीव धोक्यात घालत असते. सेल्फी काढण्याच्या नादात वांद्रे बॅण्ड स्टॅन्डवर तरन्नुम अन्सारी, अंजूम खान आणि मुश्तरी खान समुद्रात बुडाल्या. परंतु रमेश वाळुंज या युवकामुळे अंजूम आणि मुश्तरीचा जीव वाचला. मात्र तरन्नुम देवाघरी गेली. जीव वाचवण्याच्या नादात रमेश यांनाही स्वत:चा जीव गमवावा लागला. सेल्फीची हाव धरून टोकावर उभे राहत फोटो काढण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामध्ये तरुणांचाच जास्त सहभाग असतो. त्यासाठी जबाबदार तरुणांनीच खालीलप्रकारे काही प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यात असे म्हटले आहे की सेल्फीपेक्षा आपला जीव जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे सेल्फीच्या हव्यासापोटी साहसी ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचा मोह टाळा.  सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!दोन दिवसापूर्वीची घटना आहे. सेल्फी काढताना एका मुलीला अपघाताला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. उत्तरप्रदेशातील अलाहाबादमध्ये ब्रह्मपुत्रा एक्सप्रेसच्या एसी कोचमधू बबित सोरया ही १७ वर्षांची मुलगी प्रवास करत होती. युमना ब्रिज पार केल्यानंतर तिनं आपला फोन बाहेर काढला आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागली.  याच दरम्यान तिचं तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून ती खाली कोसळली. यानंतर तातडीनं लोकांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन रोखली... आणि तिला वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली धाव घेतली. जखमी अवस्थेत बबित हिला हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं.... तिची प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याची माहिती मिळतेय. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रतनगडच्या धोकादायक टोकावरुन काढलेला सेल्फी सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रतनगडच्या धोकादायक टोकावरुन काढलेला सेल्फी फेसबूकवर व्हायरल होत आहे. पण त्यामुळे सेल्फी महत्वाचा की सेफ्टी हा प्रश्न उपस्थित होत आहे.कुणी गगनचुंबी इमारतीच्या टोकावरून सेल्फी काढतंय, कुणी समुद्रात माशांसोबत, कोणी मृत्यूच्या दाढेतून सेल्फी काढतंय. परदेशात असलेलं सेल्फीचं वेड, आपल्या घरा-दारात पोहोचलंय. नुकताच फेसबुकवर देशातला सर्वात रोमांचकारी सेल्फी पोस्ट झाला आणि व्हायरलही झाला तोही आपल्या सह्याद्रीच्या रांगांमधल्या रतनगडवरचा. पुण्याच्या प्रतीक खर्डेकर या ट्रेकरनं हा फोटो फेसबुकवर टाकताच टीकेचा भडिमार सुरु झाला. अशा सेल्फींमुळे अनावश्यक साहसाला खतपाणी घातलं जात असल्याची चर्चा सुरु झाली. इतकंच नव्हे तर हा फोटो ट्रेकर्सना चिथावण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. एकीकडे टीकेचा भडिमार सुरु असताना, काही ट्रेकर्स मात्र बचावासाठी पुढे आले. कमाल ट्रिक फोटोग्राफीची असेलही, पण अशा फोटोंमुळे अनावश्यक साहसाला प्रोत्साहन मिळतं त्याचं काय? दिवसातून पाच सेल्फी काढणं हे मानसिक आजाराचं लक्षण मानलं जातं. याच सेल्फीच्या नादानं बँडस्टँडच्या समुद्रात दोघांचा जीव गेला. मुरुडच्या दुर्घटनेतही सेल्फी हेच कारण असल्याचं बोललं जातंय. त्यात गोप्रोसारख्या तंत्रज्ञानामुळे सेल्फीतल्या रोमांचानं शिखर गाठलंय. पण सिर सलामत तो सेल्फी पचास या न्यायानं धोकादायक सेल्फींना ब्लॉक करणं सा-यांच्याच हिताचं..