शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लेगिंग्स खरेदी करताना घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 15:41 IST

सध्या लेगिंग्स वापरणे ही जणू फॅशनच बनत चालली आहे. आज प्रत्येक तरुणी लेगिंग्स ही कुर्ता, ट्युनिक सारख्या गारमेंट्ससोबत कॅरी करताना दिसत आहे.

-रवींद्र मोरे सध्या लेगिंग्स वापरणे ही जणू फॅशनच बनत चालली आहे. आज प्रत्येक तरुणी लेगिंग्स ही कुर्ता, ट्युनिक सारख्या गारमेंट्ससोबत कॅरी करताना दिसत आहे. मात्र, बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट होईल अशी लेगिंग्स घेतली जात नाही, त्यामुळे आपला लूक हवा तसा दिसत नाही. आजच्या सदरात लेगिंग्स घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात. लेगिंग्स आर्टिफिशअल लेदर, मॅश, लायक्रा, कॉटन स्पॅन्डेक्स सारख्या फॅब्रिक्ससोबत घालू शकता. लेगिंग्स घातल्यावर इतक्या कंफर्टेबल असतात की एक नवी फॅशनच वाटते. लेगिंग्सची वाढती क्रेझ पाहता उत्पादकांनी बॉडी टाइपप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे लेगिंग्स बाजारात उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र, आपण लेगिंग्स खरेदी करताना नेहमी गल्लत करतो, असे निदर्शनास आले आहे. * लेगिंग्सची लांबीलेगिंग्स घेताना लांबीचा विचार नक्की करावा. लेगिंग्सची लांबी अँकलपेक्षा अधिक असू नये. अँकल एवढी असलेली लेगिंग्स अधिक सुंदर दिसते.* लेगिंग्सची फिटिंगस्कीन लेग फिट लेगिंग्स विकत घेताना फिटिंगचा नक्की विचार करावा. ही लेगिंग्स लांब असून, पातळ आणि निमुळती असावी तसेच अँकलवर संपणारी ही लेगिन्स असावी. शिवाय लेगिंग्स घेताना चांगली फर्म असलेलीच घ्या.* योग्य अंडरविअर निवडलेगिंग्स घालताना त्यामध्ये पॉइंटची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. लेगिंग्स सोबत कधीपण टाईट अंडरवेअर घालणं टाळा. कारण यामुळे लेगिंग्समधून पँटीची लाइन दिसते. आणि ते बघायला चांगले वाटत नाही. त्यामुळे लेगिंग्समध्ये ‘सीमलेस’ अंडरविअर घाला.* अँकल बूट्स किंवा स्निकर्स घ्याथंडीमध्ये आपल्या लेगिंग्सला अधिक आकर्षक बनवण्यासाठी अँकल बूट्स किंवा स्निकर्स घाला. त्याचप्रमाणे हाय बूट्स देखील लेगिंग्ससोबत चांगले वाटतात. * पॉप रंगाच्या आणि लेदर लेगिंग्स निवडा लेगिंग्स घेताना ऋतुमानाचाही विचार करावा. कोणत्या ऋतूत कोणत्या लेगिंग्स वापराव्या याबाबतही माहिती असणे गरजेचे आहे. सध्याचा हिवाळयात थंडीमध्ये लेदर आणि नियॉन सारख्या पॉप कलरच्या लेगिंग्स वापरू शकता.* शॉर्ट टॉप घालू नकालेगिंग्स घातल्यावर शॉर्ट टॉप घालू नका. शॉर्ट टॉपमुळे तुमचा लूक खूपच खराब दिसू शकतो. लेगिंग्ससोबत मिड थायपर्यंत येत असेल असे ट्यूनिक किंवा लाँग शर्ट कॅरी करा.