सुरेश वाडकर अध्यक्षपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:24 IST
सुरेश वाडकर यांची मुंबई विद्यापाठीतील बोर्ड आॅफ स्टडिज इन हिंदुस्थानी म्युझिकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सुरेश वाडकर अध्यक्षपदी
सुरेश वाडकर यांची मुंबई विद्यापाठीतील बोर्ड आॅफ स्टडिज इन हिंदुस्थानी म्युझिकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजाची जादू संपूर्ण भारतभर नव्हे तर, जगाच्या कानाकोपºयात जिथेही भारतीय आहेत त्यांच्यापर्यंत पसरली आहे.सुरेश वाडकर हे मराठी गायक आहेत. मराठी, हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. तसेच कोकणी, मल्याळी, भोजपुरी, बंगाली, गुजराती आणि उर्दू भाषेतही त्यांनी गाणी गायली आहेत. वयाच्या आठव्या वषार्पासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. भावगीत आणि भक्तीगीतांमधून ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. अखिल भारतीय नाट्य परिषद, आशा भोसले पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले सुरेश वाडकर यांच्या यशामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.