शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

स्टायलिश राहायला आवडतं मग ट्यूनिक ट्राय केलं का?

By admin | Updated: July 12, 2017 17:19 IST

झुळझुळीत तलम कपडा, असिमेट्री आणि बाह्यांचे आणि गळ्याचे अक्षरश: शेकडो प्रकार हीच या ट्यूनिकची खासियत आहे.

 

- मोहिनी घारपुरे देशमुख

लेगिन्स वा जीन्स दोन्हीहीवर खुलून दिसणारा कपड्याचा प्रकार म्हणजे ट्युनिक्स. हा एक प्रकारचा ढगळासा, स्लीव्हलेस आणि गुडघ्यांपर्यंत लांब असणारा कपड्याचा प्रकार आहे.

साधारणत: पूर्वी रोम आणि ग्रीसमध्ये या प्रकारचे कपडे स्त्रिया आणि पुरूष दोघेहीजण वापरत. लॅटीन भाषेत या प्रकारच्या कपड्यांना ‘ट्यूनिका’ असं म्हटलं जात. त्यावरूनच या प्रकाराला ‘ट्यूनिक’ असं नाव मिळालं.

खरंतर इतिहासात डोकावून पाहिलं तर याप्रकारचे कपडे आदिमानवानं वापरल्याचे दाखले मिळतात. 1830 च्या आसपास लहान मुलं ट्यूनिकवर बेल्ट वगैरे लावत असल्याचंही सापडतं. आधुनिक काळात मात्र धार्मिक अंगानेही ट्यूनिक्सचा वापर झाल्याचं दिसतं.

अलिकडे मात्र हे ट्यूनिक्स फॅशन जगतात इतके लोकप्रिय आहेत की यामध्ये प्रचंड प्रकार दिसून येतात. त्याचं ढोबळ स्वरूप, अर्थात पायाच्या गुडघ्यापर्यंत किंवा त्याहून उंचीला थोडेसे कमी आणि काहीसे ढगळे असंच असतं. मात्र, तरीही फॅशन डिझायनर्सनी या संपूर्ण सेगमेंटमध्येही बरेच प्रकार आणलेले आहेत.

 

 

झुळझुळीत तलम कपडा, असिमेट्री आणि बाह्यांचे आणि गळ्याचे अक्षरश: शेकडो प्रकार हीच या ट्यूनिकची खासियत आहे. विशेष म्हणजे लेगिन्स, जीन्स आणि स्कर्टवरही ट्यूनिक आरामात घालता येऊ शकतो. फक्त स्कर्टवर जर ट्यूनिक घालायचा असेल तर ट्यूनिकपेक्षा स्कर्टची लांबी अधीक हवी एवढीच अट काळजीपूर्वक फॉलो केली पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावर किंवा तरणतलावावर पोहायला जात असाल तर तुमच्यासाठी ट्यूनिक बेस्ट प्रकार ठरेल. याचे कारण तलम, झिरझिरीत आणि सहज दूर सारता येण्याजोगे हे वस्त्र आहे हीच त्याची विशेषत: या ठिकाणी उपयोगी पडते. तर असे हे ट्यूनिक खरंतर माणसानं आपल्या प्रारंभीच्या काळी शिकार वगैरे करताना वापरले आहे त्यामुळे त्या प्रकारच्या कपड्याचे नाविन्य नाही. मात्र तरीही या ट्यूनिक्सला मिळालेला आधुनिक टच, त्याचे आधुनिक रूपडे फॅशनेबल स्त्रीयांच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यामुळेच स्वत:ला मॉडर्न म्हणवणार्या प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये हे ट्यूनिक्स हमखास सापडणारच हे नक्की.

 

ट्यूनिक जॅकेट्स

कोणत्याही ड्रेसवर गुडघ्यापर्यंत लांब आणि तलम असे ट्यूनिक जॅकेट्स देखील वापरता येऊ शकतात. श्रग प्रमाणे पण तरीही एक हटके लुक या ट्यूनिक जॅकेटमुळे मिळतो. विशेष म्हणजे स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांसाठीही हे ट्यूनिक जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरूषही स्मार्ट लुक हवा असेल तर आपल्या वॉर्डरोबमध्ये ट्यूनिक जॅकेट्स समाविष्ट करू शकतात. स्टँड कॉलर आणि एकदम प्रॉपर फिटींगचे ट्यूनिक जॅकेट्स पुरूषांनी घातल्यास त्यांना एकदम रूबाबदार लुक येतो.

आॅनलाईन गारमेंट कंपन्यांच्या वेबसाईटवर या ट्यूनिक जॅकेट्सचे पुष्कळ प्रकार उपलब्ध आहेत, त्यांचाही आधार घेऊन शॉपिंग करता येईल.