शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

​कपड्यांवर डाग पडलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:14 IST

बऱ्याचदा कळत-नकळत आपल्या कपड्यांवर तेल, शाई, चहा, कॉफी किंवा गंजल्याचे डाग पडतात. यामुळे आपले कपडे पूर्णपणे खराब होतात. ज्यांच्या खिशात पेन असतो, त्यांना तर शाईचा डाग पडणे ही समस्या नेहमीचीच असते.

बऱ्याचदा कळत-नकळत आपल्या कपड्यांवर तेल, शाई, चहा, कॉफी किंवा गंजल्याचे डाग पडतात. यामुळे आपले कपडे पूर्णपणे खराब होतात. ज्यांच्या खिशात पेन असतो, त्यांना तर शाईचा डाग पडणे ही समस्या नेहमीचीच असते. शाईचे डाग खूप जिद्दी असतात. ते लवकर निघत नाही. मात्र खालील टिप्सच्या आधारे आपण सहज शाईचे डाग काढू शकतो. * टूथपेस्ट - ज्याठिकाणी शाईचा डाग पडला असेल त्याठिकाणी विना जेलचे टूथपेस्ट लावा. सुकल्यानंतर कोणत्याही डिटर्जंट पावडरने धुवा. * नेलपेंट रिमूव्हर - कापसाचा तुकडा नेलपेंट रिमूव्हरमध्ये बुडवून तो तुकडा डाग पडल्याच्या ठिकाणी घासा. यानंतर सामान्य पद्धतीने कपडा धुवा. * मीठ - शाई ओली असेल तर त्यावर मीठ लावा. नंतर ओला टिशू व ब्रशच्या सहाय्याने धुवून घ्या. * दूध - ज्या कपड्यांवर शाईचा डाग पडला आहे, ते कपडे रात्रभर दुधामध्ये बुडवून ठेवा. सकाळी डिटर्जंटने साफ करा. * कॉर्नस्टार्च - कॉर्नस्टार्चला थोड्याशा दुधात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट कपड्यावरील डागावर लावा. थोड्या वेळानंतर ब्रशने स्वच्छ करा.