स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेंबर्सचे होळीच्या गाण्यावर ठुमके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 23:01 IST
एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटने प्रवाशांसाठी विमानात होळी साजरी करुन चकीत केले.
स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेंबर्सचे होळीच्या गाण्यावर ठुमके
एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटने प्रवाशांसाठी विमानात होळी साजरी करुन चकीत केले. विमानाच्या टेकआॅफ पूर्वी स्पाईसजेटचे केबिन क्रू मेंबर्स होळीच्या गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहेत.त्यांचे नृत्य पाहून प्रवासीही आनंदले आणि टाळ्यावाजून त्यांना प्रतिसादही दिला. बॉलिवूडच्या एकापेक्षा एक बहारदार गाण्यावर केबिन क्रू मेंबर्सने ठुमके लावले आणि प्रवासांचे मनोरंजन केले.