शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

गतिमान एक्सप्रेस : भारतातील पहिली सेमी बुलेट ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 17:16 IST

देशातील पहिली सेमी-बुलेट ट्रेन 'गतिमान एक्सप्रेस'चे मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे

बुलेट ट्रेनचे स्वप्न बऱ्याच वर्षांपासून आपल्याला दाखविले जात आहे. आता ते प्रत्यक्षात उरविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले.देशातील पहिली सेमी-बुलेट ट्रेन 'गतिमान एक्सप्रेस'चे मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. ‘ताज महाल’ पाहण्यासाठी येणाऱ्या जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे.दिल्ली ते आग्रा हा २०० किमी प्रवास 'गतिमान  एक्सप्रेस'मुळे केवळ शंभर मिनिटांत पूर्ण होणार आहे. 160 किमी प्रतितास एवढ्या वेगाने ही रेल्वे धावणार असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात आधुनिक रेल्वे आहे. आतून विमानासारखे इंटेरिअर असून गणवेशधारी स्टफ प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत केले.दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन स्टेशन ते आग्राच्या कँटोनमेंट स्टेशन दरम्यान शुक्रवार व्यतिरिक्त सहा दिवस ‘गतिमान एक्सप्रेस’ धावणार आहे. एका एसी चेयर कार सीटचे तिकिट 750 रु. तर एक्झिक्युटिव्ह एसी चेयर कारचे तिकिट 1500 रुपये इतके आहे. रेल्वेमध्ये आठ एसी चेयर डबे तर दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेयर डबे आहेत.अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम, आॅटोमॅटिक फायर अलार्म आणि स्लायडिंग दरवाजे, मोठ्या खिडक्या , बायो टॉयलेट्स तसेच फ्री मल्टीमीडिया सर्व्हिस अशा आकर्षक सुविधा या एक्सप्रेसमध्ये देण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध पर्यटण स्थळांच्या फोटोंनी सर्व डबे सजविण्यात आले आहे.मात्र पहिल्याच प्रवासात वायफाय आणि टीव्हीसंदर्भात अनेक अडचणी आल्या असल्या ती त्यात झपाट्याने सुधारणा करण्यात येणार आहेत.अशा प्रकारच्या नऊ रेल्वे सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे ज्यामध्ये कानपूर-दिल्ली, चंदिगढ-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांचा सामावेश आहे.}}}}