शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

सामाजिक जाणीव दिवसागणिक कमी होतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 03:46 IST

समाजात पसरलेला भेदभाव आणि असमानता यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन होऊ नये म्हणूनच संयुक्त राष्ट्राने २० फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि तेव्हापासून तो या दिवशी साजरा होतही आहे. परंतु मागच्या काही दिवसात देशातील सामाजिक न्यायाची स्थिती बिघडते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. दादरी हत्याकांड, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू प्रकरण या घटनांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. विविध संस्कृती व परंपरा असतानाही एकोप्याने नांदणाºया भारतात अशा घटना घडताना बघून तरुणाई स्तब्ध झाली आहे. सीएनएक्सने या विषयावर या तरुणाईला बोलते केले असता ती अगदी भरभरून व्यक्त झाली. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. हे इतक्या तिव्रतेने पहिल्यांदा घडत आहे. आधी इतकी चिंता करणारी स्थिती नव्हती. आधी समाजातील कमकुवत गटांना मदत करणाºया कामाला तात्त्विक अधिष्ठान देणारे आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याविषयी सांगणारे अनेक लोकं भेटायचे. आज मात्र कोणीच यावर बोलताना दिसत नाही. मी माझे घर, माझी जात, या पलीकडे जावून जोपर्यंत विचार केला जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार तरी कसे, असा प्रश्न या तरुणाईने उपस्थित केला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावाआपला समाज प्रभावी होण्यास त्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. हे अंमलात येण्यासाठी आवश्यक असलेले बारकावे हे समाजाला लक्षात आणून देण्यासाठी आज थोर विचारवंतांची गरज भासत आहे. मात्र आजच्या फास्ट लाईफ स्टाईलमुळे आपल्याला त्यांच्या विचारांची गरज असतानाही त्याकडे आपले लक्ष जात नाही. आज जे काही देशात घडत आहे हे बघून त्या थोर विचारवंतांची उणीव भासत आहे. - संवेदनशील मनच उरलेले दिसत नाहीसारेच विचित्र घडत आहे. ज्या विषयामुळे आपला देश प्रगतीपथाकडे जाईल त्या विषयाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही. सामाजिक बांधिलकीची तर कुणी गोष्टही करताना दिसत नाही. समाजील दुर्बल घटकांप्रती असलेली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. काही राजकारणी आपले हित जोपासण्यासाठी समाजातील न्याय व्यावस्थेला खिंडार पाडत आहे. हे दुर्देवी आहे.      - मानवतावाद हा एकच धर्म व्हावा                   मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हटले गेले पाहिजे. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय. आजच्या युगात दया, माया अथवा त्यातूनच येणारा सामाजिक न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे.- अंजली टेकचंदानीसामाजिक बांधिलकी फक्त फोटोपुरती नको समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक विचारधारा हवी आहे. धर्म हा फार खासगी विषय आहे. त्याचा फटका इतरांना बसू नये. सामाजिक बांधिलकीची भावना फक्त फोटो काढण्यापुरती असू नये. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सामाजिक न्यायाची अपेक्षा असणाºया अनेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही मूल्ये स्वीकारलेल्या राष्ट्रात असे काही घडणे निश्चितच योग्य नाही. -  अभिषेक शर्माजेएनयूत काय सुरू आहे बघ जरा!            देशातील सामाजिक शांततेचे वातावरण बिघडतेय हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. त्यावर काही तोडगा अद्याप निघालेला नाही. न्यायासाठी आटापीटा करणाºयांना न्याय मिळत नाही. विनाकारण प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. समाजातील भेदभाव कमी व्हायची चिन्हे नाहीत. काय हाच तो भारत आहे जेथे समाजात शांतता नांदावी यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले? - अविनाश देऊळकरपटीयाला कोर्टातील उदाहरण ताजे न्याय व्यवस्था सांभाळणारी मंडळीच कायदा हातात घ्यायला लागली तर कसे होईल. एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर तो विरोध दर्शविण्याची एक पद्धत असते. त्यासाठी हिंसक होण्याची गरज नाही. असे हिंसक होताना अनेकदा मूळ विषय बाजूला पडून व्यक्तीगत द्वेष आपल्यावर हावी होत असतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असे घडणे योग्य नाही. ? - निहाल गुप्ता