Shocking : सुहाना खानच्या ‘या’ ड्रेसची किंमत जाणून व्हाल थक्क !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 15:27 IST
सुहाना या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत असून, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत !
Shocking : सुहाना खानच्या ‘या’ ड्रेसची किंमत जाणून व्हाल थक्क !
सेलिब्रेटींचे लाइफस्टाइल खरच वेगळे असते. त्यांच्या खान-पानापासून कपडे परिधान करण्यापर्यंत सर्व्याच गोष्टी अनोख्या असतात. विशेष म्हणजे आता सेलिब्रेटीच नव्हे तर सेलेब्स किड्सदेखील त्याच अंदाजात वावरताना दिसत आहेत. त्यांची लाइफस्टाइल सेलिब्रेटींपेक्षा कमी नाही. लक्झरी गाडींपासून एक्जॉटिक वेकेशन्स आणि ग्लॅमरस पार्टीजपर्यंत या सर्वच ठिकाणी त्यांचे सेलेब स्टेटसचे दर्शन घडते. आपण कदाचित ऐकले नसेल की, करिना कपुरच्या एका एअरपोर्ट लुकची किंमत सुमारे १ लाखापेक्षा जास्त होती. तर त्याच एअरपोर्टवर परिधान करण्यात आलेल्या जान्हवी कपूरच्या टॉपची किंमत सुमारे ४७ हजार रुपये होती. अशाच महागड्या वार्डरॉब चॉइसेजच्या लिस्टमध्ये लेटेस्ट नाव आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे.एका रेस्टॉरंटच्या ओपनिंगप्रसंगी सुहानाने तिची आई गौरी खानने डिझाइन केलेला एक आकर्षक ड्रेस परिधान केला होता, त्या ड्रेसची किंमत सुमारे ६० हजार रुपये होती. या लो-नेक, रेसरबॅक ड्रेसला सुहानाने क्रोम येल्लो पीपटोज, न्यूड लिप्स आणि सॉफ्ट कर्ल्ससोबत पेयर केला होता. तसे पाहिले तर एक सेलेबच्या तुलनेने या ड्रेसची किंमत तशी खूपच कमी होती, मात्र एका शाळेत जाणाऱ्या टीनेजरच्या तुलनेने मात्र हा ड्रेस खूपच महागडा होता. Also Read : शाहरूख नाही, सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा!