ती एकमेव प्रवासी असूनही विमानाने उड्डाण केलं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:03 IST
एक काय, फक्त दहा प्रेक्षक आहेत म्हणून परवडत नसल्याचं कारण देत थिएटरमध्ये सिनेमाचा खेळ रद्द केला जातो. मात्र चीनमध्ये एकट्या प्रवाशासाठी विमान हवेत झेपावल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.चीनमध्ये नूतन वर्षी मायदेशी किंवा मूळगावी जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे झँग ही एका मोटर कंपनीतील महिला कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाली. मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे सोमवारी अनेक प्रवाशांना हे फ्लाईट गाठता आलं नाही. अखेर एका महिलेसाठी बोईंग 377 जातीचं हे प्रवासी विमान दक्षिण चीनच्या गुआंगझाऊ भागातून आकाशात झेपावलं.झँगचं उे2833 हे विमानही 10 तासांनी लेट होतं. हिमवृष्टीमुळे ट्रेनचं वेळापत्रकही कोलमडलं, त्याचप्रमाणे लाखभर प्रवासी त्यांची नियोजित विमानं पकडू शकली नाहीत. मात्र झँग आल्याने चायना सदन एअरलाईन्सने एका प्रवाशासाठी विमान नेण्याचा निर्णय घेतला.झँगने एक हजार 200 युआन म्हणजेच अंदाजे 12 हजार 370 रुपये मोजले. तिने तिचा हा दोन तासांचा एक्स्क्लुझिव्ह प्रवास चिनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर शब्दबद्ध केला आहे. मला अत्यंत आनंद झाला आहे. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत दुर्मीळ आणि अविस्मरणीय अनुभव आहे. मला एखादारॉकस्टार असल्यासारखं वाटतं.ह्णएकमेव प्रवासी असल्यामुळे केबिन क्रूकडून तिच्याकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं. पायलटनेही तिची भेट घेतली.