तिने नाकरले 6.8 कोटीचे पॅकेज....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:37 IST
आकांक्षा हजारी या 32 वर्षीय युवतीने 6.8 कोटींचं पॅकेज नाकारले आहे.
तिने नाकरले 6.8 कोटीचे पॅकेज....
आकांक्षा हजारी या 32 वर्षीय युवतीने 6.8 कोटींचं पॅकेज नाकारले आहे. हाँगकाँगमध्ये लहानाची मोठी झालेली आकांक्षाने स्वत:चे स्टार्टअप सुरू केले. भारतातच एक ‘अलीबाबा’ उभा करायचा निर्धार आकांक्षाने केला आहे. अलीबाबा ही चीनची साईट आहे, यावर जगभरात मोठ्या प्रमाणात होलसेल वस्तूंची विक्री होते, याचा मोठा फायदा चीनला आहे. ही साईटवर जगभरातील लोकांना होलसेल मालाची देवाण-घेवाण करता येते, आकांक्षाने आपला निर्धार पूर्ण करण्यासाठी अलीबाबा सारखी वेबसाईट सुरू केली आहे.मुंबईत ‘एम.पाणी’ नावाचे एक स्टार्टअप आकांक्षाने सुरू केले आहे. आकांक्षाने दीड वर्षांपूर्वी सुरू केलेला हा एक लॉयल्टी प्लॅटफॉर्म आहे. यात छोट्या- छोट्या दुकानदार आणि ग्राहकांना जोडले जाते.जॅक मा यांनीही सुरुवातीच्या टप्प्यात ‘अलीबाबा’च्या माध्यमातून बायर्स आणि सेलर्स यांना जोडण्याचे काम सुरू केले होते. अलिबाबा प्रमाणे ‘एम.पाणीला’ ग्लोबल प्लॅटफॉर्म बनवण्याचे स्वप्न आकांक्षाने पाहिले आहे.