शाहरूखची अर्धशतकी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:01 IST
बॉलीवुड बादशहा शाहरूख खान येत्या २ नोव्हेंबरला वयाचे अर्धशतक गाठणार आहे...
शाहरूखची अर्धशतकी खेळी
बॉलीवुड बादशहा शाहरूख खान येत्या २ नोव्हेंबरला वयाचे अर्धशतक गाठणार आहे. हा दिवस केवळ शाहरूखसाठीच नाही तर त्याच्या लाखो फॅन्ससाठीही महत्त्वपुर्ण आहे. त्याच्या वाढदिवशी तो मुंबईबाहेर असला तरीही तो एक दिवसाची सुट्टी नक्कीच घेणार आहे. जगभरातील काही मोजक्या लोकांसोबत तो त्याचा वाढदिवस साजरा क रणार असल्याचे समजते. शाहरूख म्हणाला, ' हा माझा ५0 वा वाढदिवस असल्याने माझी टीम माझ्यासाठी काहीतरी खास करू इच्छिते. तसे तर मला प्रेम देणार्या प्रत्येकासोबतच मला माझा जन्मदिवस साजरा करायची इच्छा आहे.' शाहरूख सध्या 'दिलवाले'च्या शूटिंग निमित्त गोव्यात आहे.