सेलेनाला वाईट मुलांशी डेटिंग करायला आवडते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 14:00 IST
पॉप गायिका सेलेना गोमजचे म्हणणे आहे की, तिला वाईट प्रवृत्तींच्या मुलांशी डेटिंग करायला आवडते. गोमेजने एका साप्ताहिकाला मुलाखत देताना सांगितले की, वाईट प्रवृत्तींच्या मुलांशी डेटिंग करणे माझी कमजोरी आहे.
सेलेनाला वाईट मुलांशी डेटिंग करायला आवडते
पॉप गायिका सेलेना गोमजचे म्हणणे आहे की, तिला वाईट प्रवृत्तींच्या मुलांशी डेटिंग करायला आवडते. गोमेजने एका साप्ताहिकाला मुलाखत देताना सांगितले की, वाईट प्रवृत्तींच्या मुलांशी डेटिंग करणे माझी कमजोरी आहे. मला असे वाटते की, मुलांमध्ये वाइटपणा हा जन्मजात नसतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यातील चांगुलपणा हेरायला हवा. यावेळी गोमेजने एमी शूमर आणि जेनिफर लॉरेंस यांची प्रशंसा करताना सांगितले की, या दोघेही माझ्या फेव्हरेट आहेत. महिलांमध्ये असलेले सर्वच गुण त्यांच्यात आहेत.