जिन्सच्या छोट्या खिशाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:13 IST
तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो
जिन्सच्या छोट्या खिशाचे रहस्य
तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो, या मागे काही रहस्य आहे का?, तसा हा खिसा सध्या चिल्लर, तसेच चावी ठेवण्यासाठी तसेच तात्पुर्ता सेल फोन अडकवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र पहिल्यांदा कोणत्या कारणासाठी जीन्सला हा खिसा दिला होता, यामागील कारणंही तसेच मजेदार आहे. सुरुवातीला काही जण म्हणजेच ‘काऊ बॉईज’ कमरेला घडयाळ बांधायचे, अडकवायचे, त्यासाठी हा खिसा होता. या खिशामुळे लोंबकळणार घडयाळ, या खिशात सुरक्षित ठेवण्यात येत होत, तसेच ते कुठे धडकून फुटण्याचा धोका कमी होत होता.मात्र सध्या हा खिसा चिल्लर आणि चावी ठेवण्यासाठी परफेक्ट आहे, या खिशाची तशी मागणीही तरूणांमध्ये आहे. काळाने खिशाचा उपयोग बदललाय, बदलत्या फॅशनमध्येही हा खिसा उपयोगाचा असल्याने, जीन्स बनवणाºया ब्रॅण्डेड कंपन्यांनी तो कायम ठेवलाय.