रश्दींची नवी कादंबरी 'टु ईयर्स एट मंथ्स अँड टष्द्वेंटीएट नाईट्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:24 IST
'सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे जगात खळबळ उडवणारे सलमान रश्दी हे त्य...
रश्दींची नवी कादंबरी 'टु ईयर्स एट मंथ्स अँड टष्द्वेंटीएट नाईट्स'
'सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे जगात खळबळ उडवणारे सलमान रश्दी हे त्यांच्या नव्या कादंबरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जादुई वास्तववाद आणि काल्पनिकता (आभास) यांचा सुरेख मेळ घालणार्या या कादंबरीचे नाव 'टु ईयर्स एट मंथ्स अँड टष्द्वेंटीएट नाईट्स' म्हणजे 'दोन वर्षे आठ महिने आणि २८ रात्री'. जिनिया (जेनी) ही एक अद्भुत आगीच्या गोळ्यासारखी दिसणारी प्राणी आहे. पृथ्वीवर आल्यानंतर ती एका मानवाच्या ('इब्न रश्द'च्या) प्रेमात पडते. नंतर ती असंख्य मुलांना जन्म देते; परंतु इब्न रश्द तिला सोडून जातो. दोन वर्षे आठ महिन्यांच्या आणि २८ रात्रींच्या वास्तव्यात रश्दी यांनी एकात एक अशा अनेक गोष्टी गुंफत रंजकता वाढवली आहे. विद्युल्लतेवरही हुकूमत असणार्या जिनिया या अमानवी राजकन्येची पृथ्वीवरील र्मत्य मानवावरील प्रेमाची ही कथा आहे.