रिसेप्शनमध्ये रीवाचा ग्लॅमरस अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 16:24 IST
रवींद्र जडेजा आणि रीवाबा अर्थात रीवा रविवारी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर राजकोट येथील एका हॉटेलात ग्रॅण्ड रिसेप्शन देण्यात आले.
रिसेप्शनमध्ये रीवाचा ग्लॅमरस अवतार
रवींद्र जडेजा आणि रीवाबा अर्थात रीवा रविवारी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर राजकोट येथील एका हॉटेलात ग्रॅण्ड रिसेप्शन देण्यात आले. या रिसेप्शनमध्ये रीवाबा ग्लॅमरस वेस्टर्न वेडिंग गाऊनमध्ये तर जडेजा ब्ल्यू सूटमध्ये दिसला. जडेजा व रीवाबाच्या रिसेप्शन पार्टीत अंडर १८ टीमचे स्टार प्लेअर इशान किशनही दिसला. रिसेप्शनमधील पाहुण्यांना ३५ प्रकारच्या डिशेज ठेवण्यात आल्या होत्या. यात पंजाबी आणि साऊथ इंडियन डिशेजचा प्रामुख्याने समावेश होता. सलादचेच सुमारे दहा वेगवेगळे प्रकार आणि तितक्याच प्रकारची मिठाईही होती.