शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

Relation : प्रेम विवाहास विरोध म्हणजे संपणे नव्हे, अशी मिळवा मान्यता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:45 IST

प्रेम विवाह यशस्वी होणे किंवा अयशस्वी हा पुढचा भाग आहे. सर्वप्रथम प्रेम विवाहाला मान्यता मिळणे महत्त्वाची असते.

-रवींद्र मोरे जवळपास सर्वच चित्रपटात प्रेम कथा रंगविली जाते. चित्रपटातच नव्हे तर बहुतांश सेलेब्स चित्रपटापेक्षा आपल्या प्रेमप्रकरणामुळेच जास्त चर्चेत असतात. बहुतांश सेलेब्सचे प्रेम प्रकरण पुर्णत्वास आलेत, म्हणजे त्यांचे प्रेम विवाह यशस्वी झालेत, मात्र बऱ्याचजणांना अर्ध्यावरच ब्रेकअप झालेत. प्रेम विवाह यशस्वी होणे किंवा अयशस्वी हा पुढचा भाग आहे. सर्वप्रथम प्रेम विवाहाला मान्यता मिळणे महत्त्वाची असते. आज समाजात असे अनेक प्रेम प्रकरणे आहेत, ज्यांना कुटुंबाकडून, समाजाकडून मान्यता मिळत नाही आणि घडते ते अघटीत. बऱ्याच प्रेम विरांनी लग्नास मान्यता न मिळाल्याने भावनेच्या भरात आपली जीवनयात्रा संपविली आहे. मात्र तरुणाईने आपली जीवनयात्रा संपविण्यापेक्षा समाजाची मानसिकता आणि विचार बदलवण्याचा प्रयत्न केला तर बराच फरक पडू शकतो. त्यासाठी ऐकमेकांवर प्रेम असणाऱ्या मुलांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी पालकांना सांगायला हव्यात. मान्य आहे की, समाजाची संकुचित मानसिकता आहे. पण सकारात्मक प्रयत्न केल्याने ही मानसिकता बदलणे शक्य आहे. यासाठी सर्वात अगोदर कुटुंबातील तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या नात्याविषयी सांगा. ती घरातील प्रभावी व्यक्ती असेल तर तुमचे काम आणखी सोपे होईल. या व्यक्तील तुमच्या बाजून वळवून घ्या. म्हणजे तुमच्या कामात त्याची खूप मदत होईल. शिवाय आपल्या जोडीदाराची मित्र किंवा मैत्रिणीच्या स्वरुपात पालकांना ओळख करुन द्या. त्यामुळे तुमचा जोडीदार आणि पालकांमध्ये हे नाते निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराला पालकांना पसंत करायला सुरू केल्यानंतर हळूहळू त्यांना तुमच्या नात्याबदद्ल सांगा. पालकांच्या समोर अधून-मधून जोडीदाराचा विषय काढा. त्यांच्यासमोर त्याची स्तुती करत जा, म्हणजे ती तुम्हाला आडवते याचा संकेत त्यांना कळेल. एवढे करुनही जर तुमचे पालक तुमच्या प्रेमविवाहाच्या विरोधात उभे राहिले तर त्यांना यशस्वी प्रेमविवाहाची उदाहरणे द्या. घाईघाईत कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर शांत डोक्याने विचार करा किंवा जवळच्या लोकांची मदत घ्या.  अशा प्रकरणामध्ये संयम ठेवणे खूप गरजेचे असते. जरी अगोदर त्यांनी नकार दिला तरी हार मानू नका तुमच्या शेवटपर्यंत ठाम राहा. ते तुमचे आई-वडील आहेत त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच समजून घेतील. Also Read : ​Handsome मुलांना पाहून मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !