राधिका आपटे करणार ‘क्राईम पेट्रोल’चे सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 19:15 IST
अभिनेत्री राधिका आपटे आता छोटय़ा पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
राधिका आपटे करणार ‘क्राईम पेट्रोल’चे सूत्रसंचालन
अभिनेत्री राधिका आपटे आता छोटय़ा पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राधिका ‘फोबिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘क्राईम पेट्रोल’चे सूत्रसंचालन करेल. सोनी टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. ‘क्राईम पेट्रोल’च्या विशेष भागाचे शूटिंग बुधवारी पार पडले. फोबियाच्या प्रमोशनसाठी राधिका या शोमध्ये आली होती. ‘फोबिया’चे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले असून घरातून बाहेर पडताना घाबरणार्या मुलीची ही गोष्ट आहे. घरातून बाहेर पडलो तर आपले नुकसान होईल अशी मानसिकता यातील मुलीची आहे. ‘फोबिया’ 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.