गुणकारी अशोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:10 IST
गुणकारी अशोकाअशोकाचे झाड हे दिसायला खूप छान असतात. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करुन घर किंवा कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात आढळून येतात.
गुणकारी अशोका
गुणकारी अशोकाअशोकाचे झाड हे दिसायला खूप छान असतात. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करुन घर किंवा कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. सरळ उंच वाढणारे हे झाड आहे. हे झाड के वळ सावली देणारे नसून, यामध्ये आयुर्वेदानुसार विविध औषधाचे गुणकारी गुण सुद्धा आहेत. विविध प्रकारच्या आजाराला हे झाड उपयोगी असून, ते निरनिराळ्या आजाराचा नायनाट करते. महिलांचा पाळीदरम्यानचा रक्तस्त्राव थांबविण्यासाठीही या झाडाचा उपयोग केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस या झाडाला औषधीचे झाड म्हणून ओळख मिळत आहे. यासह अन्य आजारावरही या झाडाचा उपयोग केला जातो त्याचा कोणकोणत्या आजारासाठी उपयोग केला जातो. त्याची ही माहिती आपण जाणून घेऊया. आरोग्यवर्धक : पुरातन काळापासून अशोकाच्या झाडाचा टॉनिकसारखा प्रयोग केला जातो. पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्रावही अशोकाच्या झाडामुळे थांबणे शक्य होते. पाळीदरम्यानची महिलांची पोटदुखी व बैचेनीसुद्धा यामुळे दुर होते. आयुर्वेदानुसार महिलामधील सिस्ट व फाईब्रॉएडही यामुळे ठीक होण्यास मदत होते. मुळव्याध : अलीकडे मुळव्याध ही समस्या मोठय़ा प्रमाणात उद्भवली आहे. तरुणांपासून सर्वचजण या व्याधीने त्रस्त आहेत. हा आजारही बरा करण्यासाठी