प्रिन्स हॅरीने घेतला आईचा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:55 IST
प्रिन्स हॅरीने घेतला आईचा आदर्शराजकुमार हॅरी याने आपली आई डायनाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचा वसा स्वीकारला असून नुकतीच त्याने एचआयव्ही बाधितांच्या रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्याने लंडनमधील माईल्डमे रुग्णालयातील कर्मचार्यांशी चर्चा केली.
प्रिन्स हॅरीने घेतला आईचा आदर्श
राजकुमार हॅरी याने आपली आई डायनाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचा वसा स्वीकारला असून नुकतीच त्याने एचआयव्ही बाधितांच्या रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्याने लंडनमधील माईल्डमे रुग्णालयातील कर्मचार्यांशी चर्चा केली.यापूर्वी डायनानेही अशा रुग्णालयास भेटी दिल्या होत्या. केरी रीव्ह्ज-क्निप यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायनाने १९९७ साली आपल्या मृत्यूपूर्वी या रुग्णालयास १७ वेळा भेट दिली होती. डायना यांनी तीन वेळा सार्वजनिक भेटी दिल्या. त्याहून अधिक खासगी भेटी होत्या. ज्यावेळी त्या रुग्णांना भेटत त्यावेळी चहा पिऊन स्टाफसोबत चर्चा करायच्या आणि गप्पाही मारायच्या.