1111 कॅरेटचा अनमोल हिरा जगात सर्वात अनमोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:13 IST
जगातील सर्वात अनमोल हिरा बोट्सवाना येथील खाणीत सापडला आहे.
1111 कॅरेटचा अनमोल हिरा जगात सर्वात अनमोल
जगातील सर्वात अनमोल हिरा बोट्सवाना येथील खाणीत सापडला आहे. लुकॅरा डायमंड कंपनीने हा हीरा शोधला असून आकाराच्याबाबतीत तो कुलीनन हिर्यानंतर जगातील दुसर्या क्रमांकाचा हिरा आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या राजमुकुटामध्ये कुलीनन हिरा लावलेला आहे. टाईप-2ए प्रकारातील हा 1111 कॅरेट हिरा आकाराने टेनिस बॉल इतका आहे. गेल्या शंभरवर्षांमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे, अशी माहिती व्हॅन्कुवर स्थित लुकॅरा डायमंड कंपनीने दिली.कंपनीचे सीईओ विल्यम लॅम्ब यांनी सांगितले की, 'एक हजार कॅरटपेक्षा मोठे हिरे मिळणे ही खरचं खूप दुर्मिळ बाब बाहे. आणि गेल्या शंभरवर्षांत तरी एवढा मोठा हिरा मिळाल्याची ऐकिवात नाही.' बोट्सवाना येथील करोवे खाणीमध्ये हा हिरा मिळालेला आहे.या हिर्याची अचुक किंमत किती असेल याबाबत लंडन स्थित विश्लेषक म्हणाले की, 'अशा दुर्मिळ हिर्याची किंमत ठरविणे फार अवघड असते. रंग, स्पष्टता, कटिंग आणि पॉलिशिंग गुणवैशिष्ट्यांना विचारात घेऊन हिर्यांची किंमत ठरवित असतात.