शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूसच्या खरेदीची फसवणूक टाळण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 13:33 IST

महाराष्ट्रात देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातींचे आंबे ग्राहकांना विकले जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल देवगड हापूसची चव चाखायला मिळत नाही.

-Ravindra Moreकोकणातील देवगड तालुक्यात हापूस आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. हा आंबा देवगडचा हापूस म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र महाराष्ट्रात देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातींचे आंबे ग्राहकांना विकले जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल देवगड हापूसची चव चाखायला मिळत नाही. यासाठी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी उत्पादक संघाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील प्रमुख बाजार आवारातील विक्रेत्यांमार्फत अस्सल देवगड हापूसची विक्री करण्यात येणार आहे.ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच ग्राहकांना देवगड हापूस ओळखता यावा, यासाठी संस्थेचे नाव असलेले विशिष्ट बॉक्स तयार करण्यात आले आहेत. या बॉक्समधून देवगड हापूसची विक्री करण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक, कोड क्रमांक, संस्थेचा मोबाईल क्रमांक, नोंदणी क्रमांक याबाबत माहिती देण्यात आली आहे. एखाद्या बॉक्समधील फळ खराब निघाले तर त्याची तक्रार संस्थेकडे करता येईल. विक्रेत्यांवर संघाचे नियंत्रण असणार आहे. सामान्यांना देवगड हापूसची चव चाखता यावी, यासाठी आकाराने लहान असलेला आंबा विक्रीसाठी पाठवला जाणार आहे. कसा ओळखाल देवगडचा हापूसदेवगडची साल पातळ असून ती साल सहज निघते, त्याचा गर केशरी रंगाचा असतो शिवाय सालीसोबत गर निघत नाही तसेच फोडीसोबत रेषा निघत नाहीत. देवगड हापूसच्या ओळखीची जपवणूकफळबाजारातील विक्रेते शेखर कुंजीर यांच्या गाळ्यावर एक एप्रिलपासून देवगड हापूस विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. संपूर्ण हंगामात फळांच्या आकारानुसार दर ठरवण्यात येणार आहेत. तीनशे ते सातशे रुपयांपर्यंत डझनाचे दर असतील. देवगड हापूसची ओळख जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत, असे जोशी यांनी सांगितले.