पुनावालांचा स्पष्टवक्तेपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:53 IST
पुनावालांचा स्पष्टवक्तेपणापुनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पुनावाला स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.
पुनावालांचा स्पष्टवक्तेपणा
पुनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पुनावाला स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. एका वेल्थ रिपोर्ट कंपनीच्या लंच दरम्यान याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पुनावालांचे कुटुंब हे मोठे असून तुमच्या संपत्तीचा नेमका वारस कोण असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की आमचे कुटुृंब हे छोटे व सुखी कुटुंब असून मला फक्त एकच मुलगा (आदर) आहे. त्यामुळे माझ्या संपत्तीचा वारस तो एकटाच असेल यात शंकाच नाही. पण त्याला मात्र दोन मुले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आदर समोर निर्माण होऊ शकतो, असे ते गंमतीने म्हणाले.