शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:32 IST

जगभरातील हुशार लोक

मेंदू हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीर रचनेचा प्रमुख भाग आहे. मेंदू नक्की काय करतो, ज्यामुळे लोक इतके हुशार होतात. काही जण जन्मजातच ‘ढ’ असतात, तर काही जणांना हुशारपणाची देणगी मिळालेली असते. जगात सध्या सर्वात हुशार कोण आहेत, त्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत...टेरेन्स टाओ (बुद्ध्यांक २३०)अत्यंत बुद्धिमान असणाºया टाओ यांचा बुद्ध्यांक २३० इतका आहे. जगातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आॅस्ट्रेलियन मुळ असणारे चीनी अमेरिकन गणितीतज्ञ टाओ हे गुणसुत्राचे वर्गीकरण, विविध समीकरणे, मिश्रणे, रॅम्से थिअरी, रँडम मॅट्रीक्स थेअरी आणि इतर अनेक सिद्धांतावर काम करीत असतात. वयाच्या आठव्या वर्षी टाओ यांनी प्री-१९९५ सॅट परीक्षेत ७६० गुण मिळविले होते. वयाच्या २० व्या वर्षी पीएच. डी. मिळविली आणि २४ व्या वर्षी ते युक्लाचे प्राध्यापक बनले. २००३ साली त्यांनी क्ले रिसर्च अ‍ॅवॉर्ड मिळविले. २००२ साली बोचर मेमोरिअल प्राईज तर २००० साली सलेम पुरस्कार मिळविला.ख्रिस्तोफर हिराटा  (बुद्ध्यांक २२५)बालपणापासूनच ख्रिस्तोफर हा अत्यंत हुशार म्हणून गणला गेला. वयाच्या १२ व्या वर्षी आंतराष्टÑीय भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये तो पहिला आला. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने मंगळ ग्रहासंदर्भात सुरु असलेल्या संशोधनात नासामध्ये भाग घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी प्रिन्सटोन विद्यापीठातून त्यानी पीएच. डी. मिळविली. हिराटा हा अत्यंत बुद्धिमान मुलगा असल्याचे सिद्ध झाले. सध्या ते सीआयटी (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.किम युँग-याँग  (बुद्ध्यांक २१०)२१० बुद्ध्यांक असणाºया कोरियन स्थापत्य अभियंता युँग-याँग यांचे पाय लहानपणापासूनच पाळण्यात दिसत होते. सहाव्या महिन्यातच ते बोलायला शिकले आणि कोरियन आणि इतर भाषा समजू लागले. वयाच्या तिसºया वर्षी त्यांना अनेक भाषा अवगत झाल्या. त्यात कोरियन, जपानी, जर्मन आणि इंग्रजीचा समावेश होता. या काळात त्यांनी त्यांनी जपानी टीव्हीवरील अनेक अवघड प्रश्न सोडविले. सर्वाधिक बुद्ध्यांक असणारा म्हणून गिनीज बुकात त्यांची नोंद झाली आहे.डॉ. इव्हँजेल्स कॅटसिओलिस  (बुद्ध्यांक १९८)बुद्धिमत्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळवून प्रसिद्ध झालेल्या डॉ. इव्हँजेल्स कॅटसिओलिस हे ग्रीकचे नागरिक आहेत. ते वैद्यकीय क्षेत्रात आणि मानसोपचार क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी तत्वज्ञान, वैद्यकीय संशोधन शास्त्र आणि मानसोपचारऔषधीशास्त्रची पदवी मिळविली आहे. जागतिक गुणवत्ता संस्था (विन)चे ते संस्थापक आहेत. यामध्ये सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्तींचा समावेश आहे. ते अत्यंत छान चित्रकार आहेत.ख्रिस्तोफर लंगन (बुद्ध्यांक १९८)ख्रिस्तोफर यांना बुद्ध्यांक १९५ ते २१० या दरम्यान आहे. सर्वात हुशार अमेरिकन, त्याचप्रमाणे जगातील हुशार व्यक्ती म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. सहाव्या महिन्यातच ते बोलायला लागले आणि तिसºया वर्षी स्वत:च वाचायला लागले. मन आणि स्थिती यामधील संबंधाचा सिद्धांत तयार केला आहे. त्याला ‘कॉग्निटिव्ह-थिअरॉटिकल मॉडेल आॅफ द युनिव्हर्स’ असे नाव दिले आहे.